
कोल्हापूर : सावित्रीबाई, जिजाऊ ताराराणींचा आपल्याला विसर पडता कामा नये. त्यांचा हा वारसा पुढच्या पिढीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्या समाजाची प्रगती होते. तो समाज पुढे जातो. मुलगा मुलगी भेद करू नका. दोन्ही समान आहेत. आणि महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे अशी अपेक्षा अतिरिक्त पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी व्यक्त केली. महाराणी ताराबाई ३५०वी जयंती वर्ष लोकोत्सव समितीच्या वतीने साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आज पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पत्रकारांचा त्यामध्ये इंदुमती गणेश, शुभांगी तावरे, श्रध्दा जोगळेकर, अनुराधा कदम, अश्विनी टेंबे, अनुराधा कदम, प्रिया सरीकर यांचा सन्मान करण्यात आला.बलाढ्य बादशहा औरंगजेबाशी सात वर्षे कडवी झुंज देणाऱ्या मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्यातील धैर्य, कर्तृत्व आणि शौर्याचा इतिहास आजच्या पिढीतील सर्व मुली व महिलांना प्रेरणादायी आहे. ताराराणींचा हा वारसा महिलांनी पुढे न्यावा, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी व्यक्त केले.
शाहू स्मारक भवन येथे सोमवारी महाराणी ताराबाई ३५०वी जयंती वर्ष लोकोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
समितीच्या सदस्या शैलजा भोसले यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महाराणी ताराराणी यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आत्ता ताराराणीचा वारसा चालवणाऱ्या महिला पत्रकारांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानदेखील करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास संपत्ती पाटील, संयोगिता देसाई, आनंद माळुंगेकर महेश मजले शंकरराव शेळके रामचंद्र पोवार, अवधूत पाटील यांच्यासह लोकोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply