
कोल्हापूर: पद्मश्री डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने भव्य गौरव सोहळा आदरणीय पद्मश्री डी. वाय. पाटील, मातोश्री शांतदेवी डी. पाटील, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. डॉ. कैलास सत्यार्थी जी, सौ. सुमेधा सत्यार्थी, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील हॉस्पीटल परीसर, कदमवाडी येथे पार पडला. एक सकारात्मक विचार घेऊन संजय भैय्यांनी आपले आयुष्य घडवले. कर्तृत्वाबरोबरच दार्तृत्वही आपल्या ठाय़ी बाळगणाऱ्या भैयांनी आयुष्यात अनेकांना आधार दिला. यासाठी आदरणीय दादांचे प्रेम आणि आईंचा आशिर्वाद नेहमीच त्यांच्यासाठी उर्जा बनून राहिली असून आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे अशा भावना यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते ‘ध्यासपर्व’ या डॉ. संजय डी. पाटील गौरव ग्रंथा’चे आणि डॉ. कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ‘ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर के मुदगल, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ प्रभात रंजन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, कुलसचिव डॉ. व्हि.व्हि भोसले, डॉ.भालबा विभुते, डीन डॉ. आर. के. शर्मा,आकुर्डीचे कॅम्पस डायरेक्टर एडमिरल अमित विक्रम तसेच प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सौ. सुप्रियाताई चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, सौ. राजश्री काकडे, श्री भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, सौ पूजा पाटील, सौ वृषाली पाटील यांच्यासह कुटुंबीय, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply