
कोल्हापूर: आपण सर्वजण अशा एका जगात राहतो जो एकाला मागे टाकून दुसरा पुढे जातो. पण ज्ञान हे सर्वांचे आहे आणि सर्वांसाठी आहे. ही धरती संतांची आहे. त्यांनी धर्म आणि करूणा याची शिकवण दिली. आणि शिक्षणानेच माणूस आत्मनिर्भर बनतो, असे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी केले.डॉ.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त नोबेल शांतता पारितोषिक विजेते डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत ते म्हणाले,जनता नेहमीच समस्यांची झुंजत असते आणि त्यातूनच सरकार शिकत असते. जिथे सरकारने आपले जबाबदारी झटकली तिथे गैरसरकारी संघटनांनी आपली भूमिका चौख बजावली आहे.आंतरराष्ट्रीय कायदा असूनही युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. संयुक्त राष्ट्र असूनही त्यांचे त्यावर नियंत्रण नव्हते. एका समस्येचे समाधान झाले की पुन्हा नवीन समस्या उद्भवतात. हे दुष्टचक्र चालतच राहते. पाखंडी धर्मगुरू जे लोकांच्या लोकांच्या बुद्धीशी भेद करतात अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी स्वयंसेवी संघटनांनी काम करणे अपेक्षित आहे.सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे खरं खोटं याचं एक जंजाल मेंदूमध्ये तयार होत आहे. या सर्व गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजेत. आणि समाजातील प्रत्येक घटकाशी आपले अंतरिक आणि भावनात्मक नाते निर्माण झाले पाहिजे. संपूर्ण भारतात एका तासात आठ मुले बेपत्ता होतात. तर एका तासात पाच मुला मुलींचे येऊन शोषण होते. त्यामुळे नैतिकतेने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्या हस्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांच्या हिंदी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार जयंत आसगांवकर, सुमेधा सत्यार्थी, डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासह कोल्हापुरातील विविध एनजीओचे प्रमुख, पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply