
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना केले.भीमा कृषी पशू प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला.आज उपस्थित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.यावेळी व्यासपीठावर माजी.आमदार महादेवराव महाडिक, खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेली १७ वर्षापासून भीमा कृषी व पशु प्रदर्शन मधून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती पूरक माहिती साधने विक्री व खरेदी करता येत आहेत.प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली असून चार दिवसांमध्ये मोठी उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहावयास खरेदी करता येते असे सांगितले.सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना पुढे आणल्या जात आहेत याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. किसान क्रेडिट कार्ड आता तीन लाखाहून पाच लाखापर्यंत करण्यात आले आहे किसान योजना आहे १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रधानमंत्री अन्नधान्य योजना अंमलात आणली जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे देशातील १४४ करोड लोकांना कसदार धान्य उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना वीज बिले माफ केली आहे सोलर बाबत योजना पुढे आणली आहे. भीमा गुणवंत पुरस्काराने पशुधन विकास अधिकारी डॉ.दिपाली चितरंजन भुतकर गणबावले,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक लिंगाप्पा गावडे, डॉ.हनुमंत गुरव, पशुधन पर्यवेक्षक डॉ.आनंदा पाटील, डॉ. निवृत्ती पाटील, डॉ. पल्लवी खोत, डॉ .दिलीप बारड, वर्णउपचारक श्री. संजय पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. ड्रोन दीदी रेश्मा पाटील सीमा पाटील, सन्मान केला गेला.शिवाय कृषी अधिकारी उमेश पाटील यांचाही मानपत्र देऊन शेतकरी,संस्था यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी भीमा कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक,आमदार सुरेश हाळवणकर,माजी आमदार भरमु अण्णा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस,कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप महानगर कोल्हापूर विजय जाधव, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा नाथाजी पाटील, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष भाजप राजवर्धन निंबाळकर, भाजप कोल्हापूर महानगर महिला जिल्हाध्यक्ष सौ.रूपाराणी निकम, महिला जिल्हाध्यक्ष भाजपा कोल्हापूर पश्चिम प्रा. अनिता चौगुले,सौ. पुष्पा पाटील , उपाध्यक्ष काडाचे राहुल चोरडिया उपस्थित होते.जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.प्रमोद बाबर.आदी उपस्थित होते.आभार भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वजित महाडिक यांनी मानले.विधायक रेडा आकर्षण पहिल्याच दिवशी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
Leave a Reply