
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मोफत दूध वाटप करण्यात आले. बस स्थानकाजवळील वटेश्वर मंदिरात भाविकांना दुधाचा अभिषेक करण्यासाठी हे मोफत दूध वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे, संचालक शशिकांत पाटील – चुयेकर, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. त्याचबरोबर वटेश्वर मंदिरासमोर गोकुळचा स्टॉल उभा करण्यात आला होता. तेथे सर्व भाविकांना गोकुळची सर्व उत्पादने सवलतीच्या दरात देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी महादेव मंदिरांमध्ये भाविकांसाठी हे दूध वाटप करण्यात आले असल्याचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांनी सांगितले.
Leave a Reply