
कोल्हापूर : तब्बल तीन पिढया सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये विविध वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणाऱ्या शिवाजी उद्यम नगरातील पंत वालावाकर हॉस्पिटलमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि महानगरात उपलब्ध असणारी अर्थोपेडिक सेवा – ऑपरेशन सर्जरी उपलब्ध झाली आहे . क्षेत्रातील आधुनिक शिक्षण घेण्याबरोबरच लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि आर एन कॉपर मुंबई या वैद्यकीय विश्वातील प्रतिष्ठेच्या दवाखान्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेले कोल्हापूरचे सुपुत्र आणि तिसऱ्या पिढीत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आर्यन गुणे आता आपली सेवा या ठिकाणी देणार आहेत आज त्यांची औपचारिक स्वागत प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी , नेत्र विभागाचे वीरेंद्र वीरेंद्र वणकुंद्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी संवाद साधताना डॉक्टर आयर्न गुणे यांनी आपण पारंपरिक शिक्षणाबरोबरच ट्रामा केअर विभागातील आधुनिक पद्धतीच्या आणि रुग्णास कमीत कमी शारीरिक त्रास होणाऱ्या उपचार पद्धती आपण अनेक ऑपरेशन सह मुंबईतील आर एन कुपर तर पुण्यातील लोकमान्य हॉस्पीटल मध्ये डॉ. एन . व्ही .वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली यामधील बारकावे अगदी प्रत्यक्ष ऑपरेशन करताना समजावून घेतली आहेत आणि त्यामध्ये निपुण्यता आणि प्राविण्य मिळवलं आहे .आपल्या जन्म गावातच मला या आधुनिक सेवा सुविधा आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी देण्याची संधी देण्यास संधी उपलब्ध होत आहे ही माझ्यासाठी एक मोलाची बाब असून मी अधिकाधिक कौशल्याने माझे योगदान देत राहील असे मनोगत व्यक्त केले . यावेळी आपल्या मनोगतात संतोष कुलकर्णी यांनी डॉ .आर्यन गुणे यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय सेवा सुविधा आता पंत वालावलकर हॉस्पीटल मध्ये उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता नेत्र – ई एन टी – दंत चिकित्सा वैदकीय उपचार सेवा समर्पित भावनेने कार्य करणारी तगडी डॉक्टरांची आणि सहकाऱ्यांची टीम कार्यात आहे त्यामुळे या ठिकाणी या सर्व सेवा सुविधांचा लाभ रुग्ण आणि नातेवाईकांनी घ्यावा असे आहवान ही यांनी यावेळी केले .
Leave a Reply