
मुंबई: अन्यायकारक नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आज सकाळी दहा वाजता शक्तिपीठ विरोधी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातील हजारो नागरिक या आंदोलनासाठी आझाद मैदानावर एकत्र येत आहेत. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द असे फलक घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा धडक मोर्चा आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे. शक्तीपीठ महामार्ग मध्ये बाधित होणारे सर्व शेतकरी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून एकत्रित आले आहेत. जमीन आमची मायबाप आहे. अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा करून वेगवेगळ्या प्रकारच्या पाणी योजना आणल्या आणि आता जमीनच नाही राहिली तर आम्ही काय करायचं असा आक्रोश शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.
Leave a Reply