स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक वाटचाल करा:डॉ. वेदप्रकाश मिश्रा; डी. वाय.पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

 

कोल्हापूर: विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असली तरी शिक्षण संपलेले नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिने वाटचाल करा. मोठी स्वप्ने बाळगा आणि ती परिश्रमपूर्वक पूर्ण करा. आपली स्वाक्षरी ही ‘ऑटोग्राफ’ बनेल इतके यश मिळवा असे आवाहन इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ग्लोबल नेटवर्क फॉर मेडिकल हेल्थ प्रोफेशन्स अँड बायोथिक्स एज्युकेशनचे महासचिव आणि डॉ. बी. सी. रॉय अवार्डने सन्मानित डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी ६९० विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या आवारात भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, युजीसी प्रतिनिधी डॉ. उमराणी, माजी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील यांच्यासह एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी १९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. डॉ. रणजीत निकम या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. तर डॉ. सागर गोयल यास ‘बेस्ट आउट गोइंग स्टुडंट’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी १७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पीएच. डी. प्रदान करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मिश्रा म्हणाले, डी.वाय. पाटील विद्यापीठासारख्या प्रथितयश शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण नक्कीच यशस्वी व्यावसायिक व्हाल. पण केवळ व्यवसाय किंवा नोकरी हे ध्येय न बाळगता उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सतत अपडेट ठेवा. कुशल आणि सुजाण मनुष्यबळ बळच देशाची ताकद वाढवते. त्यामुळे आपण मिळवलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी करा, असे आवाहनही डॉ. मिश्रा यांनी यावेळी केले.कुलगरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांनी यावेळी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकांना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती देऊन पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. उमाराणी जे., प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, प्राचार्य अमृतकुंवर रायजादे, प्राचार्य रुधिर बारदेस्कर, डॉ आर. एस. पाटील, प्रा. डॉ. अजित पाटील, वैदयकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उप कुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव तेजशील इंगळे, यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थामधील प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे, डॉ.अमित बुरांडे, प्रा. रेणुका तुरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!