किर्लोस्कर ऑइल इंजिन्सने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार

 

पुणे: किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न झाला आहे. हि महत्वाची घटना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या कामगार कल्याण, औद्योगिक सौहार्द आणि शाश्वत विकासाच्या प्रति बांधील असण्याचे प्रतीक आहे. हा करार उत्पादकता वाढ, कर्मचाऱ्यांचे हित आणि कंपनीचे दीर्घकालीन यश यांना चालना देणाऱ्या कार्यसंस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.वेतन करार वेळे अगोदर आणि प्रगतिशीलपणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण इतिहासाचे द्योतक म्हणून २०११ मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे झालेले वेतन करार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले आहेत. या यशामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावते.
वेतन करार सोहळ्यास कंपनीचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक सौ. गौरी किर्लोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सहाय, मुख्य मानव संसाधन अधिकारी जॉर्ज वर्गिस, मुख्य वित्तीय अधिकारी सचिन केजरीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालन) मकरंद जोशी, बीटूबी विभागाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अमरजीत सिंग, उत्पादन विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुख वीरेंद्र गायकवाड आणि फॅक्टरी मॅनेजर मिलिंद बोटे यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.
कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजीव गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र येडे, सचिव उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केले. हा करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर विश्वास, सहकार्य आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे.
या यशस्वी वेतन करारामुळे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या प्रगत आणि कर्मचारी-केंद्रित कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळाली आहे. कंपनीचा विकास, नवकल्पना आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत औद्योगिक सौहार्द टिकवून ठेवण्याच्या दिशेने कंपनी सातत्याने पुढे जात आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही केवळ औद्योगिक क्षेत्रातील सौदार्ह्यास चालना देणारी कंपनी नसून विविध उद्योगांमध्ये शाश्वत, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदान करणे हेच कंपनीचे व्यापक ध्येय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!