
कोल्हापूर: तब्बल पाच दशकं सहकार, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपलं संपूर्ण आयुष्य झोकून योगदान देणारे गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सर्वपक्षीय भव्य अमृतमहोत्सवी नागरी सत्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते, आदरणीय खासदार शाहु छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर, नाम. हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शिरोली दुमाला (करवीर) येथे पार पडला. यानिमत्ताने आबाजींच्या कार्याचा आढावा घेणारा ‘अमृतविश्व’ गौरव अंक प्रकाशित करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा भक्कम पाया असलेल्या सहकार चळवळीतून आबाजींचं नेतृत्व घडून आलं. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा गोकुळ दूध संघाच्या दूरगामी विचारांचा वारसा आबाजींनी सहकार क्षेत्रात प्रभावीपणे पुढे नेला. आबाजींनी केलेल्या लोकाभिमुख सहकार कार्याची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, अशा भावना यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केल्या.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार चंद्रदीप नरके, जयंत आजगावकर माजी आमदार संपतबापू पवार- पाटील, राजेश पाटील, के.पी.पाटील, सुजित मिणचेकर, जि.प. माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि सर्व संचालक मंडळ, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजी पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरूणकुमार डोंगळे, राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाबासो पाटील- आसुर्लेकर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामिण) नाथाजी पाटील, दुधगंगा- वेदगंगा साखर करखान्याचे माजी व्हा. चेअरमन विठ्ठलराव खराटे, चेतन नरूटे, कॉ. दिलीप पवार, जी. डी. भास्कर, शिरोलीचे सरपंच सचिन विश्वास पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार दि, 13 एप्रिल, 2025 स्थळ- शिरोली दुमाला (करवीर)
Leave a Reply