
कोल्हापूर : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज भक्तांचा १ मे रोजी दिवशी गौरव कार्याचा नि:स्वार्थ सेवेचा गुणगौरव सोहळा पार पडला. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यात अखंड अन्नदान, एक दिवसीय अन्नदान, माँ वसुंधरा पायी दिंडी उत्कृष्ट सेवा, नर्मदा अन्नदान योजना, पादुका दर्शनसोहळा उत्कृष्ट सेवा, उत्कृष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील जनम संस्थानचे प्रोटोकॉल अधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातील जुने ज्येष्ठ गुरुबंधू, नाणिजधाम गुरुसेवक, दौरा गुरुसेवक यांसह विविध क्षेत्रात सेवा देणार्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, मुख्यपीठ साहाय्यक दीपक खरुडे, ,मुख्यपीठ महिला निरीक्षक सौ. सीमा पाटील, प्रोटोकॉल अधिकारी विजय धनवडे प्रोटोकॉल, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी, कोल्हापूर जिल्हा सचिव दिलीप कोळी, कोल्हापूर जिल्हा निरीक्षक विजय लगड, विजयकुमार पाटील यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरूंनी सांगितलेली सेवा भक्तांसाठी सर्वश्रेष्ठ ! – सुनील ठाकूर
या प्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर म्हणाले, ‘‘गुरूंनी सांगितलेली सेवा, आज्ञा, आदेश आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असली पाहिजे. त्या आज्ञेचे जर आपण पालन केले, तर आपली प्रगती निश्चित होते. जेव्हा आपण भक्ती करतांना आपला पूर्णभार गुरूंवर सोडतो, त्यांना पूर्णत: शरण जातो तेव्हा आपली प्रगती निश्चित होते.’या मेळाव्यात सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत वार्तांकन करणार्या वार्ताहरांचा सन्मान करण्यात आला. त्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर अजय केळकर, ‘टि.व्ही. नेक्स्ट’मराठीचे राजेंद्र मकोटे, ‘ई-सिटी न्यूज’चे सागर ठाणेकर, ‘वार्ता शक्ती’च्या श्रद्धा जोगळेकर, ‘दैनिक वार्ता’चे प्रकाश देवणे, दैनिक क्रांतीसिंह आणि कोल्हापूर २४ न्यूजच्या शुभांगी तावरे, ‘नाईट वॉच’चे अविनाश काटे, ‘अँगल’ मिडियाचे अक्षय थोरवत यांचा समावेश होता.
Leave a Reply