डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद

 

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. फिजिओथेरपी कॉलेजची श्रावणी अशोक जंगटे व स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचा प्रणव विनोद आंबले यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून सन्मानित करण्यात आले.स्पर्धेमुळे खिलाडूवृत्ती व सांघिक भावना वाढते. जय-पराजय यावर अधिक लक्ष न देता खेळामध्ये सहभाग घेऊन तंदुरुस्तीवर अधिक लक्ष द्यावे. पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केले.कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, विद्यापिठाच्या आठ संस्थेतील 910 खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक 10 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर एनएसएस, एनसीसी, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे खेळातील सहभाग वाढवणे गरजेचे आहे.यावेळी विविध खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू व संघाना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अद्वैत राठोड, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जगमे, प्राचार्या डॉ. अमृतकुवर रायजादे, प्रा. डॉ. अजित पाटील, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व क्रीडा विभागप्रमुख उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!