कोल्हापूर: ओरा फाइन ज्वलेरी या भारतातील आघाडीच्या डायमंड ज्वेलरी ब्रँडला त्यांच्या सुप्रसिद्ध ‘एकता’ – द वेडिंग कलेक्शन अंतर्गत नवीन डिझाइन्स सादर करण्याचा आनंद होत आहे. लग्नसराई हंगामासाठी परिपूर्ण असलेल्या या नवीन डिझाइन्स विद्यमान लोकप्रिय कलेक्शनला अधिक लक्षवेधक करतात, ज्यामध्ये प्रेम, वारसा आणि आधुनिक भव्यतेच्या गाथा सुरेखरित्या सामावलेल्या आहेत. हा सीझन अधिक विशेष बनवण्यासाठी ओरा विशेष ऑफर्स देत आहेत, ज्या १ जून २०२५ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत.
‘एकता’ – द वेडिंग कलेक्शन आजच्या वधू आणि त्यांच्या विवाहांसाठी येणाऱ्या मैत्रिणींच्या सर्वसमावेशक इच्छांची पूर्तता करत आहे, ज्या आकर्षक व वैविध्यपूर्ण हिऱ्यांची मागणी करतात. हे कलेक्शन बारकाईने डिझाइन केलेल्या वजनाने हलक्या कॉकटेल दागिन्यांपासून भव्य स्टेटमेंट सेट्सपर्यंत वैविध्यपूर्ण श्रेणी देते, ज्यामुळे प्रत्येक विवाहामध्ये वधू व वधूच्या मैत्रिणी, माता आणि बहीणी आकर्षक दिसत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची खात्री मिळते. ग्रेडियंट लीफ मोटिफ्सने प्रेरित हिरव्या आणि लाल रत्नांसह आकर्षक हिऱ्याच्या दागिन्यांचे सेट सादर केले आहेत. या कलेक्शनचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक हिऱ्याच्या थरांचे नेकलेस, ज्यामधून समकालीन आकर्षणासह परंपरा दिसून येते.
ओरा फाइन ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपू मेहता म्हणाले, ”’एकता’ – द वेडिंग कलेक्शन नेहमी भारतीय विवाह सोहळ्याच्या पवित्र व आनंदमय प्रवासाला मानवंदना राहिले आहे. नवीन डिझाइन्स आणि आमच्या स्पेशल सीझनल ऑफर्ससह आमचा बहुमूल्य ग्राहकांसाठी हा अनुभव अधिक आनंददायी व उपलब्ध होण्याजोगे करण्याचा मनसुबा आहे. हे कलेक्शन एकत्रित आनंद घेतल्या जाणाऱ्या क्षणांमध्ये उत्साहाची भर करते, तसेच प्रत्येक वधू व तिच्या मैत्रिणी आकर्षक हिऱ्याच्या दागिन्यांसह मोहक दिसण्याची खात्री देते, ज्यामुळे त्या संस्मरणीय क्षणांचा आनंद घेऊ शकतील.”
उत्साहपूर्ण हळदी व मेहंदी समारोहापासून लक्षवेधक संगीत समारोहापर्यंत विवाह व रिसीप्शनच्या भव्यतेमध्ये अधिक उत्साहाची भर करत ‘एकता’ कलेक्शन प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण सुशोभितपणाची भर करते, ज्यामुळे विवाह सोहळा अधिक भव्य व आकर्षक होतो.
ओरा यंदा लग्नसराई हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट हिऱ्याचे दागिने उपलब्ध करून देत आहे, तसेच या भव्य ऑफर्स भारतभरातील स्टोअर्समध्ये १ जून २०२५ पर्यंत वैध आहेत:
• हिऱ्याच्या मूल्यावर २५ टक्के सूट: ‘एकता’ कलेक्शनमधील आकर्षक हिऱ्याच्या नेकलेसचा (५ लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीचे) आनंद घ्या आणि हिऱ्याच्या मूल्यावर २५ टक्क्यांची सूट मिळवा.
• ० टक्के डाऊन पेमेंट*
• ० टक्के व्याजासह ईएमआय*
*सर्व ऑफर्सवर अटी व नियम लागू.
अधिक माहितीसाठी, भेट द्या – https://www.orra.co.in

Leave a Reply