कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा सामंजस्य करार

 

कोल्हापूर : कॅन्सर रुणांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे नाव आता जागतिक ‘स्तरावर पोहचले आहे. यातील पुढचे पाऊल म्हणून कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकेशी संलग झाले आहे.याबाबतचा सामंजस्य ‘करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे प्रमुख
तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ. सूरज पवार आणि कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेचे कार्यकारी संचालक आणि मुख्य विकास अधिकारी राजेश मंथेना यांनी साक्षरी करून कराराचे अदान-प्रदान केले.
मागील २० वर्षंपासून कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे काम, अद्ययावत तंत्रज्ञान, कामाचा दर्जा, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण यामध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटर अहोरात्र काम करत आहे आणि एका छोट्या शहरात कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी ठरले आहे हे पाहून कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका ही संस्था कोल्हापूर कॅन्सर सेंटरशी जोडली गेली.
पश्चिम महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा येथील ५० हजारांहून अधिक उपचार कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे झाले आहेत.
कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी सामंजस्य करार झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचारांचा लाभ
होणर आहे. तसेच कॅन्सर क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा लाभ रुग्णसेवेकरिता करता येणार
आहे. या सामंजस्य करारामुळे देशातील आणि परदेशतील रुग्णांना देखील सेवा देता येणार आहे. असे डॉ. सुरज पवार यांनी स्पष्ट केले.
दरग्यान, अमेरिकेतून कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाचे चेअरमन ऑफ बोर्ड डॉ.शलीन शहा यांनी यावेळी लाईव्ह व्हीडिओ कॉन्फरन्समार्फत संवाद साधला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रेश्मा पवार यांनी कोल्हापूरच्या कॅन्सर रुग्णांना कोणता लाभ घेता येईल हे विशद केले. यावेळी डॉ. योगेश अनाप, डॉ.पराग वाटवे यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!