कोल्हापूर : भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेकडून महाराष्ट्रात दोन दिवसांचा भव्य ‘ऑटो लोन मेळा’ आयोजित केला जात आहे. हा मेळा 3 आणि 4 जून 2025 रोजी (मुंबई वगळता) महाराष्ट्रातील 325 शाखांमध्ये पार पडणार आहे.या मेळ्यात भाग घेणाऱ्या प्रमुख चारचाकी वाहन डिलरशिप्स त्यांच्या नव्या गाड्या सादर करतील. मेळा येणाऱ्या ग्राहकांना गाड्या प्रत्यक्ष पाहता व टेस्ट ड्राईव्ह करता येतील. पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुरी व सोप्या हप्त्यांमध्ये परतफेडीच्या सुविधा मिळतील.हा ऑटो लोन मेळा ग्राहकांना अधिकृत आणि विश्वासार्ह गाडी विक्रेत्यांशी जोडण्यासाठी एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देतो, तसेच एचडीएफसी बँकेच्या ‘एक्सप्रेस कार लोन’च्या माध्यमातून त्वरित कर्ज वितरण सुनिश्चित करतो. ही सुविधा विद्यमान तसेच संभाव्य एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.‘एक्सप्रेस कार लोन’ प्लॅटफॉर्म संपूर्ण डिजिटल, कागदपत्रविरहित आणि कॉन्टॅक्ट-फ्री प्रक्रिया सक्षम करतो, ज्याद्वारे वाहन कर्ज फक्त 30 मिनिटांत डिलरला वितरित केले जाते. एचडीएफसी बँकेच्या ‘एक्सप्रेस कार लोन’द्वारे ग्राहकांना कोणतेही कागदपत्र न देता आणि 100% डिजिटल प्रक्रियेद्वारे फक्त 30 मिनिटांत गाडी खरेदी करता येते.“ऑटो लोन मेळा हे संभाव्य खरेदीदार आणि डिलर्स यांना एकाच छताखाली आणून, गाडी खरेदीचा सोपा आणि सुलभ अनुभव देण्यासाठी आहे. पात्र ग्राहकांना आकर्षक ऑफर्स आणि तात्काळ कर्ज मंजुरी मिळेल. ग्राहक-केंद्रितता आणि सोयीचा अनुभव देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे एचडीएफसी बँकेचे महाराष्ट्रातील ब्रँच बँकिंग प्रमुख तरुण चौधरी यांनी सांगितले.

Leave a Reply