सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो अव्‍वल चार विजेत्‍या टीम्‍सना  प्रकल्‍पांच्‍या इन्‍क्‍यूबेशनसाठी १ कोटी रूपये देणार 

 

कोल्‍हापूर: पुण्‍यातील डायनॅमिक क्‍लासरूम्‍सपासून कोल्‍हापूरमधील कल्‍पनात्‍मक जागा आणि वडोदरामधील जिज्ञासू व्‍यक्‍तींपर्यंत सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो रोडशोजनी संपूर्ण महाराष्‍ट्रात आणि गुजरातमध्‍ये सर्जनशीलता व उद्देशाची लाट निर्माण केली आहे.२९ एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्‍यात आलेली सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो ही संपूर्ण भारतातील स्‍पर्धा आहे, जी विद्यार्थ्‍यांना तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक विश्‍वातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी टूल्‍स, मार्गदर्शन व संसाधनांसह सक्षम करते. सॅमसंग प्रमुख, आयआयटी दिल्‍लीमधील प्राध्‍यापकवर्गाकडून मार्गदर्शन आणि प्रोटोटाइपिंगसाठी पाठिंब्‍यासह हा उपक्रम अव्‍वल चार टीम्‍सना १ कोटी रूपये बक्षीस म्‍हणून देतो. पण, हा उपक्रम तरूणांना महत्त्वाकांक्षीपणे स्‍वप्‍न पाहण्‍यास आणि निर्णयात्‍मक कृती करण्‍यास प्रेरित करतो.पुण्‍यातील डीपीएस स्‍कूल व मनसुखभाई कोठारी स्‍कूल, कोल्‍हापूरमधील एसपीएसएमबीएच कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर व एनआयटी सभागृह आणि वडोदरामधील न्‍यू एरा स्‍कूल व आनंद विद्या विहार स्‍कूल येथे नुकतेच आयोजित करण्‍यात आलेल्‍या रोडशोजमध्‍ये या उपक्रमाचा परिवर्तनात्‍मक प्रभाव दाखवण्‍यात आला.पुण्‍यातील इयत्ता अकरावीमधील विद्यार्थी आकाश अस्पष्ट संकल्पना घेऊन आला, पण शाश्वत पॅकेजिंगसाठी स्पष्ट दृष्टीकोन आत्‍मसात केला. ”सॅमसंग सोल्व्ह फॉर टूमारोने मला दाखवून दिले की, मी ही संकल्पना प्रत्यक्षात आणू शकतो,” असे त्याने सांगितले.वडोदरा येथील आनंद विद्या विहारमधील रोहनने दूरस्थ शिक्षण घेणाऱ्यांसाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशाने मोबाइल अॅपसाठी वायरफ्रेम डिझाइन केले. ”मला खात्री घ्‍यायाची आहे की, माझ्या चुलत भावासारखी मुले मागे राहणार नाहीत,” असे तो म्हणाला.कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचा विद्यार्थी ईशानला स्थानिक हस्तकलेला नवीन रूप देण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रेरणा मिळाली. ”हे भूतकाळाला भविष्याशी जोडण्याबद्दल आहे,” असे तो म्‍हणाला.संपूर्ण सत्रांमध्‍ये विद्यार्थ्‍यांनी स्‍मार्ट कृषी साधनांपासून मानसिक आरोग्‍य प्‍लॅटफॉर्म्‍स आणि किफायतशीर सोलार इनोव्‍हेशन्‍सपर्यंत नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स सादर केले. ते परिवर्तनाला चालना देण्‍याप्रती समान कटिबद्धता आणि त्‍यांच्‍यामधील क्षमतेमध्‍ये विश्‍वासासह एकत्र आले.”या संकल्‍पना सहानुभूतीने प्रेरित आहेत,” असे पुण्‍यातील इव्‍हेण्‍टमध्‍ये एक शिक्षक म्‍हणाले. ”ते इतरांना मान्‍यतेसाठी नाही तर मदत करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍स निर्माण करत आहेत.”रोड शोमध्ये डिझाइन विचारसरणीची ओळख झाली, विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारण्यास, सहानुभूती दाखवण्यास, परिभाषित करण्यास आणि प्रोटोटाइप करण्यास प्रेरित करण्‍यात आले. त्‍यांना समस्‍यांमागील प्रमुख कारण समजण्‍याची माहिती देण्‍यात आली.सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो पुढे जात असताना त्‍यांचा प्रभाव स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे: ते नाविन्‍यतेला चालना देण्‍यासोबत भविष्‍याला आकार देत आहे, जेथे क्‍लासरूममधील संकल्‍पना विश्‍वामध्‍ये बदल घडवून आणू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!