कोल्हापूर:कोल्हापुरातील गुणवंत महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या न्यू कॉलेजची ११ मजली इमारत साकारत आहे. याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे. सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनीही इमारत निधीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या इमारत बांधकामासाठी मालोजीराजे छत्रपती यांनी १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रा. विनय पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. न्यू कॉ लेजचे माजी विद्यार्थी डॉ. बी. एम. हिर्डेकर, दिलीप सूर्यवंशी, डॉ. आझाद नायकवडी, सुभाष देसाई,काजल कोथळीकर, शुभांगी तावरे, डॉ. अभिजीत डुबल, विक्रम रेपे, प्रा. नंदकुमार बुराण यांनी मनोगते व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा नायकवडी यांनी केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार प्रा. अमर सासने यांनी मानले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply