हेटीचचे पहिले एचईएक्स स्टोअर कोल्हापुरात सुरू 

 

कोल्हापूर : हेटीच इंडियाने कोल्हापूरमधील पहिले हेटिच एक्सक्लुझिव्ह (एचईएक्स) स्टोअर सुरू केले असून, कंपनीने देशभरातील ग्राहकांना आकर्षक इंटिरियर अनुभव देण्यासाठी आपले स्टोअर्स अधिक विस्तारले आहेत. या स्टोअरचे उद्घाटन हेटीच इंडियाचे वरिष्ठ प्रतिनिधी जितीन अग्रवाल (चीफ मार्केटिंग ऑफिसर – हेटिच इंडिया, सार्क, मिडल ईस्ट आणि आफ्रिका) आणि फ्रँचायझी पार्टनर विनय पटेल यांच्या हस्ते फीट कापून करण्यात आले.
हे उद्घाटन हेटीचच्या या वर्षी भारतभरात 25 एचईएक्स स्टोअर्स सुरू करण्याच्या धोरणात्मक योजनेचा भाग आहे. कोल्हापूरसारख्या टियर-2 शहरांमध्ये स्टाईल, आराम आणि आधुनिक डिझाइन यांचा संगम असलेल्या प्रीमियम राहणीमानाची आवड वेगाने वाढत आहे. हे लक्षात घेऊन, हेटीच आपल्या नाविन्यपूर्ण फर्निचर फिटिंग्ज, आर्किटेक्चरल डोअर हार्डवेअर, फर्निचर लाइट्स आणि बिल्ट-इन अप्लायन्सेस ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचवण्याची योजना आखत आहे.
उद्घाटनावेळी हेटीच इंडियाचे सेल्स डायरेक्टर राहुल ठक्कर म्हणाले, “हेटीचमध्ये आम्ही नेहमी ग्राहकांच्या शक्य तितक्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. अशा अनुभवात्मक टचपॉईंट्समुळे ग्राहकांना आमची उत्पादने प्रत्यक्ष पाहता येतात, स्पर्श करून अनुभवता येतात आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळते. वाढता शहरी मध्यमवर्ग आणि तेजीला आलेला रिअल इस्टेट बाजार यामुळे कोल्हापूरमध्ये आधुनिक फर्निचर आणि इंटिरियर सोल्यूशन्सची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी हेटीच एक्सक्लुझिव्ह स्टोअर जर्मन इंजिनिअरिंगची जादू आणि आमच्या पुरस्कारप्राप्त नवकल्पना ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे.”
एचईएक्स कोल्हापूर स्टोअरमध्ये ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा असलेला सोल्यूशन-शॉपिंग अनुभव मिळतो. येथे खास तयार केलेले फर्निचर फिटिंग्ज, आर्किटेक्चरल डोअर हार्डवेअर, फर्निचर लाईटिंग आणि बिल्ट-इन किचन अप्लायन्सेस यांचे आकर्षक डिस्प्ले पाहायला मिळतात. या स्टोअरमध्ये फ्री डिझाईन सर्व्हिस देखील उपलब्ध आहे, जिथे प्रोफेशनल डिझाइनर्स ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर किंवा जागा प्रत्यक्षात साकारण्यात मदत करतात.
एचईएक्स स्टोअर्स हेटीचच्या एक्स्पीरियन्स सेंटर्स सोबत मिळून काम करतात आणि ग्राहकांना कल्पनेपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत मार्गदर्शन करणारी मजबूत व्यवस्था तयार करतात. प्रत्येक सोल्यूशन हे स्मार्ट, टिकाऊ आणि बदलत्या जीवनशैलीनुसार तयार केलेले आहे.
हेटीचने ग्राहक व इंटिरियर क्षेत्रातील व्यावसायिकांना या नव्या एचईएक्स स्टोअरमध्ये येऊन प्रीमियम प्रॉडक्ट्सचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. स्टोअरचा पत्ता : हेटिच एक्सक्लुझिव्ह स्टोअर नारायणी ट्रेडिंग, 712/10 ए वॉर्ड, छत्रपती राजाराम टिंबर  मार्केट येथ सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!