मुंबई:जागतिक प्लास्टिक व्यापारात भारत निर्णायक उडी घेण्यासाठी सज्ज आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयदृष्टीखाली, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए) ने पुढील तीन वर्षांत भारतातील प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीला चौपट वाढवण्याची महत्वाकांक्षी रणनीती जाहीर केली आहे. तसेच २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेची घोषणाही करण्यात आली.एआयपीएमए च्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अरविंद मेहता म्हणाले, “हा फक्त व्यापार विस्तार नसून, भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचा राष्ट्रीय मिशन आहे.” जागतिक प्लास्टिक फिनिश्ड वस्तूंचा व्यापार सुमारे १,३०० अब्ज डॉलर्स इतका आहे, परंतु भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच एकूण ०.९६% इतका आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत एकट्याने ७२.३५ अब्ज डॉलर्स किमतीची प्लास्टिक उत्पादने आयात केली जातात, परंतु त्यात भारताचा वाटा फक्त १.२% आहे. योग्य धोरणांमुळे २-३ नवीन पॉलिमर प्लांट्स, प्लास्टिक मशिनरी व सहयोगी युनिट्समध्ये १००% वाढ, एमएसएमई -आधारित उत्पादनात मोठी भर पडू शकते. रोजगार व कौशल्यविकासात भर पडेल. चीनच्या कॅन्टोन फेअर च्या उदाहरणावरून योग्य शासकीय धोरणे निर्यात कशी बदलू शकतात हे स्पष्ट होते.एआयपीएमए चे अध्यक्ष मनोज आर. शाह यांनी “ही फक्त व्यापाराची गोष्ट नाही; तर लाखो एमएसएमई ना सक्षम करणे, देशभरात रोजगार निर्माण करणे आणि भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे.” एआयपीएमए च्या एक्स्पोर्ट सेल ने २१ देश व ९ एचएसएन कोड्सचा सखोल अभ्यास केला आहे. यात भारताचा प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स निर्यात हिस्सा १.२% आहे, तर चीनचा २२% व व्हिएतनामचा ४% आहे. अभ्यासात युएसए, चीन, जर्मनी, मेक्सिको, फ्रान्स, इटली, यूके, कॅनडा, पोलंड, नेदरलँड्स, तुर्की, जपान, स्पेन, बेल्जियम, यूएई, ब्राझिल, चिली, इथिओपिया, घाना, केनिया व नायजेरिया या देशांचा समावेश आहे.या मिशनला गती देण्यासाठी एआयपीएमए ने तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत. या परिषदा एआयपीएमए तर्फे सीपीएमए, पीएमएमएआय व ओपीपीआय यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित असून भारत सरकारच्या रसायन व खत मंत्रालयातील रसायन व पेट्रोकेमिकल विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभाग आणि एफआयइओ यांनी समर्थित आहेत. ही तिसरी परिषद २४ सप्टेंबर २०२५ रोजी हॉटेल ललित, मुंबई येथे होणार आहे.भारतातील प्लास्टिक उद्योग आता फक्त उत्पादनापुरता मर्यादित नसून गुणवत्ता, नवोन्मेष व जागतिक विश्वासाचे प्रतीक बनत आहे. योग्य धोरणे, मजबूत शासकीय समर्थन व उद्योजक वृत्तीमुळे भारत वेगाने “प्लास्टिकचा विश्वगुरू” होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Leave a Reply