कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या काळात महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर वास्तू व बांधकामविषयक दालन आयोजित करण्यात आहे. अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत व दालनचे अध्यक्ष महेश यादव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ३० जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दालन प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
या दालन प्रदर्शनामध्ये १६० स्टॉल असून आतापर्यंत १०० हून अधिक स्टॉलची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये १२५ हून अधिक बांधकामांचे सादरीकरण होणर आहे. रेसिडेशियल, कमर्शियल व प्लॉटसंदर्भात माहिती मिळणार आहे. दालनच्या नियोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी महेश यादव, उपाध्यक्ष आदित्य बेडेकर यांच्यासह निखिल शहा, पवन जामदार, संग्राम दळवी, अमोल देशपांडे, उदय निश्चिते, शौर्य मगदूम व लव पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. यंदाचे हे १३ वे दालन असून कोल्हापूर परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणांचे बांधकाम व इमारत साहित्यविषयक नवनवीन प्रकल्पाची माहिती मिळणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही दालनची जागृती करण्यात येणार असल्याचे महेश यादव यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, गणेश सावंत, अजय डोईजड, गौतम परमार, केतन शहा, बलराज पाटील, श्रीकांत पाटील, प्रतीक होसमणी, श्रीराम पाटील, विजय माणगावकर, संदीप बोरचाटे, योगेश आठले उपस्थित होते.

Catching the live action on QH88! Always a good time. Check out the stream here: qh88live. Let’s go!