कोल्हापूर : सौंदती डोंगर येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेकरिता दरवर्षी कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जातात. सदरच्या यात्रेकरिता गेली ३५ वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या १२ वर्षात केलेल्या पाठपुराव्यामुळे दरवर्षी वर्षी एस.टी. महामंडळाने सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी खासबाब म्हणून प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी. प्रमाणे भाडे दर आकारणी व खोळंबा आकार रुपये १०/- प्रती तास बस आकारण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे भाविकांचे लाखो रुपये वाचले आहेत. परंतु एस.टी. महामंडळ तोट्यात असल्याने यावर्षी पुन्हा एस.टी. बसेसच्या भाडे व खोळंबा आकारामध्ये वाढ करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला होता. याबाबत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना व करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनांच्या शिष्टमंडळाने दर व खोळंबा आकार कमी करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली होती. त्यानुसार सौंदत्ती यात्रेसाठी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आज सौंदत्ती यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या विशेष बसेससाठी कि.मी. आकार व खोळंबा आकाराचे परिपत्रक पारित केले असून, यामध्ये विशेषबाब म्हणून किमान कि.मी.प्रमाणे आकारणी न करता प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रति कि.मी. रुपये ६४/- दराप्रमाणे आकारणी करण्यास व खोळंबा आकार रुपये १०/- प्रति तास प्रति बस आकारण्यास मान्यता दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.सदर सवलत आगामी डिसेंबर २०२५ व फेब्रुवारी २०२६ या महिन्यातील पौर्णिमेच्या यात्रेकरिता सौंदती यात्रा, कर्नाटक करिता विशेष यात्रा सवलत म्हणून असणार असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.सौंदत्ती डोंगर येथे गेले १२ वर्षे सौंदत्ती येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सलग तीन दिवस वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार सेवा भाविकांसाठी उपलब्ध असणार असून, याचाही लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

For anyone who’s looking, this jili7downloadfree site lets you download the JILI7 app. It’s totally free, so go check it out. Good lookin’ out!