कोल्हापूर,: भारतातील नंबर एक फर्निचर ब्रँड असलेल्या रॉयलओक फर्निचरने आपल्या उत्कृष्ट ‘कंट्री स्टोअर’ संग्रहाचे उद्घाटन करून कोल्हापूर, महाराष्ट्रात आपले ‘प्रमुख स्टोअर’ सुरू केले आहे.
हा भव्य उद्घाटन सोहळ्यास खासदार शाहू महाराज छत्रपती,
रॉयलओक इन्कॉर्पोरेशन प्रा. लि.चे अध्यक्ष विजय सुब्रमण्यम,राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय सिंद्धू सभा आणि अध्यक्ष, सिंधी पंचायत धर्मशाळा, इचलकरंजीचे भगीरथजी छाबडा,क्षेत्रीय प्रभारी, कोल्हापूर संत निरंकारी मिशनचे अमरलालजी निरंकारी, उपाध्यक्ष, सिंधी समाज कोल्हापूरचे रमेशभाई तनवाणी,आर्किटेक्ट संगीता भांबुरे,अध्यक्ष, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट, इचलकरंजीचे राजेंद्र खंडेराजूरी यांच्या हस्ते करण्यात आले.
हा विस्तार रॉयलओकची कोल्हापूरच्या लोकांना दर्जेदार फर्निचर सोल्यूशन्स प्रदान करण्याची प्रतिबद्धता दर्शवतो.या भव्य लाँच कार्यक्रमात रॉयलओक टीमचे सदस्य देखील उपस्थित होते, किरण छाब्रिया, फ्रँचायझी प्रमुख,थम्मैय्या कोटेरा, व्हिज्युअल मर्चेंडायझिंग आणि नवीन स्टोअर ओपनिंग प्रमुखाणे अजय शर्मा, प्रादेशिक प्रमुख पश्चिम आणि उत्तर भारत आणि अजय दहाके, क्लस्टर व्यवस्थापक. यासोबतच फ्रँचायझी भागीदार असलेल्या लक्झेटा होम डेकॉर्स चे सचिन संजयकुमार नागदेव,विरेन भरत लखमानी आणि आदित्य भरत लखमानी हे देखील उपस्थित होते.
या यशस्वी व्यवसायाच्या विस्तारामुळे, या ब्रँडने गेल्या काही वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि अनेक विक्रेते व भागीदारांसह भविष्यातील व्यावसायिक विस्तारासाठी नवे मार्ग खुले केले आहेत.१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ व्यापलेल्या या प्रभावी स्टोअरमध्ये घराच्या प्रत्येक भागासाठी फर्निचरचा विस्तृत आणि मोठा संग्रह उपलब्ध आहे, ज्यात लिव्हिंग रूम्स (बैठकीची खोली), बेडरूम्स, डायनिंग क्षेत्र, स्टडी आणि ऑफिस, आउटडोअर, होम डेकोर, मॅट्रेस (गाद्या) आणि बरेच काही समाविष्ट आहे. कोल्हापूरचे रहिवासी आता आपल्या परिसरातच किफायती दरात उपलब्ध असलेले, स्टायलिश, स्मार्ट आणि उपयुक्त फर्निचरचे विविध प्रकार शोधू शकतात. भारतात एकूण २०० स्टोअर्स असून कोल्हापुरातील चोखंदळ ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे फर्निचर नक्कीच पसंत पडेल असा विश्वास यावेळी विजय सुब्रमण्यम आणि किरण छाब्रिया यांनी व्यक्त केला.

If you are looking for a new online club, 66clubbet is a good choice. I enjoy a great online experience. Check them out: 66clubbet