पश्चिम महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात भव्य प्रदर्शन ‘दालन’ ३० जानेवारी पासून

 

कोल्हापूर: क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ हे प्रदर्शन यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा ठरणार आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रेडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ प्रदर्शन ३० जानेवारीपासून महासैनिक दरबार येथे सुरू होणार आहे.
क्रेडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान महासैनिक दरबार मैदानावर भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३० रोजी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. हसन मुश्रीफ असतील, तर आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सुरू असेल.

दालन २०२६ चे चेअरमन महेश यादव यांनी सांगितले की, या प्रदर्शनात १७० स्टॉल्स असून सर्व बुकिंग पूर्ण झाले आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्याने ग्राहकांची मोठी सोय होईल.
प्रदर्शनादरम्यान तांत्रिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जानेवारीला प्रा. एम. जी. गाडगीळ आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर तर १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधणार आहेत.
या प्रदर्शनाची ब्रँड अॅम्बेसेडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आहेत. दालनबाबत प्रार्थना बेहरे
म्हणाल्या, घर बांधताना किंवा खरेदी करताना वैयक्तिकरीत्या खूप धावपळ करावी लागते, याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. त्यामुळे ‘दालन’मध्ये एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाल्यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार आहे.
क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे उपस्थित होते. यांच्यासह क्रेडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!