कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन कोल्हापूर आणि नोव्हा आयव्हीएफ सेंटर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित ८ मार्च रोजी हॉटेत वृषाली येथे महिला डॉक्टर यांच्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्षा डॉ.आशा जाधव, जीपीए अध्यक्षा डॉ . वर्षा पाटील,डॉ,महेश्वरी जाधव, डॉ .इंद्रनील जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्याचा गौरव करणारा महत्वाचा हा दिवस महिला दिन असतो.या महिला दिनानिमित मुख्य आयव्हीएफ सल्लागार .नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर कोल्हापूरचे डॉ इंद्रनील जाधव हे वंध्यत्व निवारण अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.महिला जनरल सर्जन डॉ. आशा जाधव या नारी इच्छाशक्ती कर्तृत्व,साफल्य या विषयावर विचार मांडणार आहेत.तर सीपीआर बालरोग विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश्वरी जाधव या बाल संगोपन,बालरोग तज्ञ मातेच्या नजरेतून या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिला डॉक्टर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला जीपीए अध्यक्ष डॉ.वर्षा पाटील,सचिव डॉ.राजेश सोनवणे, खाजनीस डॉ.दीपक पोवार,नोव्हा केंद्र प्रमुख
मुझ्झमील पाटील,सेल्स प्रमुख प्रमोद माशाळे आदी उपस्थित होते.
