भारत हे जगाचं भविष्य ; डॉ.ज्ञानवत्सल स्वामी डी.वाय.पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

 

कोल्हापूर : भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेत सर्व अभ्यासक्रम मिळून दरवर्षी जितके विद्यार्थी पदवी मिळवतात तितके आपल्या देशात फक्त अभियांत्रिकची पदवी घेतात, त्यामुळं भारत हे जगाचं भविष्य आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. यासाठी स्वतःला अनेक नियम घालून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज युग हे तंत्रज्ञानाचं आणि मोबाईलचं आहे. याचा वापर हा करावाच लागेल. मात्र यांचा वापर नियंत्रित आणि चांगल्या कामासाठी उपयोग करा असा मोलाचा सल्ला दिला. आयुष्यात पैसा सर्वकाही नाही, तर माणसं कमवायला शिका. आपल्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ द्या. जगण्यात नीतिमत्तेला महत्त्व द्या. त्याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे विसरू नका. कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद होण्याचा प्रयत्न करा, तरच एक समाधानी आयुष्य जगता येईल, असं आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभासाठी जागतिक कीर्तीचे लाईफ कोच डॉ. ज्ञानवत्सल स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
भव्य शोभायात्रेनं दीक्षांत समारंभाला सुरुवात करण्यात आली. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला शिक्षण तज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांच्यासह एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते. यावेळी १७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकानं गौरवण्यात आलं. एकूण १४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पीएच. डी. प्रदान करण्यात आली. तर एकूण ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
लाईफ इज ब्युटीफूल या विषयावर डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी आपले विचार मांडले. यामध्ये त्यांनी माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांच्या भेटीवेळी त्यांच्याकडून मिळालेला पॉझिटिव्हिटी आणि आपल्या गुरु कडून मिळालेला आय कॅन या दोन्हीची सांगड घालता आली तर एक चांगलं सुखी, समाधानी आणि यशस्वी आयुष्य जगात येईल असा कानमंत्र त्यांनी दिला. डि वाय पाटील ग्रुप विषयी बोलताना, तुम्ही किती चांगलं आयुष्य जगताय यापेक्षा तुम्ही किती लोकांना चांगलं आयुष्य देताय हे महत्वाचं. डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून पाटील कुटुंबीय कित्येकांना एक चांगलं आयुष्य देण्याचं काम करत आहेत. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ जागतिक दर्जाचं शिक्षण देत असून राष्ट्र उभारणीत महत्वाचं योगदान देत असल्याचं सांगत, भारत फक्त विकसित राष्ट्र नाही तर विश्वगुरु सुद्धा बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या विद्यापीठाची निवड करून योग्य निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. इथं घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग देश सेवा आणि समाजाच्या प्रगतीसाठी करा. व्यवसायिक आयुष्यात नेहमी नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सचोटी जपा. सतत शिकत रहा आणि कठोर परिश्रम चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करा असं आवाहन कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी केले.
विद्यापीठास राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय नामांकित संस्थेकडून मिळालेलं मानांकन, पुरस्कार, डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्य सेवा, शांतादेवी मेरिट स्कॉलरशिप, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश अशा विविध घटकांची सविस्तर माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली.या समारंभास सौ.शांतादेवी.डी पाटील, डी. वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. मनिष भल्ला, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी आंबीचे कुलगुरु डॉ. शिरीष पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, मुबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळोखे, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, सीएचआरओ श्रीलेखा साटम, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, सर्व विभागाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!