परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव यांची निवड

 

कोल्हापूर: दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी कोल्हापूरच्या जनतेसाठी केलेल्या संघर्षाची आणि जनसेवेची परंपरा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्याच सेवाभावाचा वारसा आणि माजी आमदार तसेच शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभलेले युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी जनतेच्या आग्रहास्तव कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि प्रभाग क्रमांक ११ मधून दणदणीत विजय संपादन करत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला.नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या पदाधिकारी निवडीत महायुतीने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत परिवहन समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड केली. या निवडीने युवा नेतृत्वावर दाखवलेला विश्वास अधिक दृढ झाला असून कोल्हापूरच्या विकासाच्या वाटचालीत एक नवा अध्याय सुरू झाला आहे.जनतेशी घट्ट नाळ जपणारा, युवकांच्या समस्या समजून घेणारा आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन डोळ्यासमोर ठेवणारा हा युवा उद्योजक आता परिवहन समितीला नवसंजीवनी देत तिचा नावलौकिक वाढवणे आणि समिती स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास घेऊन सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारत आहे.या आनंदाच्या क्षणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून प्रेरणेचे स्मरण करण्यात आले. तसेच कैलासगडची स्वारी मंदिरात दर्शन घेऊन नव्या जबाबदारीची पवित्र सुरुवात करण्यात आली.यावेळी नुतन सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी महायुतीचे सर्व नेते, महापौर, उपमहापौर, महापालिकेतील सर्व गटनेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानत सर्वांना विश्वासात घेऊन कोल्हापूरच्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार परिवहन सभापती सत्यजित जाधव यांनी व्यक्त केला.

Comments are closed.

error: Content is protected !!