१ मे महाराष्ट्र दिनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रंगकर्मी, कलाकार या पवित्र ठिकाणी काम करणारा असून त्यांच्या सूचनांचा आदर ठेवून, त्यांना विश्वासात घ्या. जबाबदारीची जाणीव ठेवा, कोल्हापूरच्या अस्मिता असलेले या कामात कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कामाची पाहणी आ.राजेश क्षीरसागर यांनी केली.केशवराव नाट्यगृहात सुरुवातीला पुर्नबांधणीच्या कामाची त्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या.

Comments are closed.

error: Content is protected !!