इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी) देशातील विविध भागांमध्ये इंधनाच्या मागणीत वाढ होत असतानाही पेट्रोल (एमएस), डिझेल (एचएसडी) आणि एलपीजीची अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देशभरात आपले संचालन आणि लॉजिस्टिक्स समन्वय सुरू ठेवत आहे. अलीकडील काही दिवसांत इंडियनऑइलने पेट्रोलियम उत्पादनांच्या ऑफटेकमध्ये लक्षणीय वाढ अनुभवली आहे, ही वाढलेली मागणी विविध कारणांमुळे होत आहे, जसे की ग्रामीण कृषी पट्ट्यांमध्ये सुरू असलेल्या हंगामी मशागत आणि कापणीच्या कामांमुळे. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांव्यतिरिक्त इतर पुरवठादारांच्या तुलनेत असलेल्या किंमत फरकामुळे ग्राहक सार्वजनिक क्षेत्रातील रिटेल आउटलेट्सकडे वळत आहेत. याशिवाय, संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचे रिटेल इंधन केंद्रांकडे स्थलांतर झाल्याने अतिरिक्त मागणीही निर्माण झाली आहे.
इंडियनऑइल आपल्या देशव्यापी टर्मिनल्स, डेपो, पाइपलाइन, एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आणि रिटेल आउटलेट्सच्या विस्तृत नेटवर्कद्वारे अखंडित पुरवठा सुरू ठेवत आहे. पुरवठा पथके, वाहतूक नेटवर्क, टर्मिनल ऑपरेशन्स आणि निवडक रिटेल आउटलेट्स चोवीस तास कार्यरत असून, उत्पादनांची सुरळीत वाहतूक आणि बाजारपेठांमध्ये वेळेवर पुनर्भरण सुनिश्चित करत आहेत. अखंडित इंधन पुरवठ्यासाठी इंडियनऑइल राज्य प्रशासनाशीही जवळून समन्वय राखत आहे.नागरिकांनी नेहमीप्रमाणेच खरेदी करावी आणि घाबरून जाऊन जादा खरेदी टाळावी, असा सल्ला देण्यात येत आहे. तसेच, इंधन उपलब्धतेसंदर्भातील अचूक माहितीसाठी ग्राहकांनी केवळ इंडियनऑइलच्या अधिकृत संस्थांकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.
