आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच;लाईफ कव्हर आणि कर-कार्यक्षम संपत्ती निर्मितीचा मेळ साधणारा  पहिला युलिप 

 

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर लाँच केले आहे, जो इन-बिल्ट (अंगभूत) हमीयुक्त मॅच्युरिटी लाभासह भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील पहिली युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) आहे.आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअर हा एक नॉन पार्टिसिपेटिंग लिंक्ड इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्ज लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे आणि कर-कार्यक्षम हमीयुक्त लाभांचे आश्वासन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी याची रचना करण्यात आली आहे. हे उत्पादन एक सोपा प्रस्ताव मांडते – एकच वेळ गुंतवणूक करा, पॉलिसीच्या मुदतीत लाईफ कव्हरद्वारे सुरक्षित राहा आणि पाच वर्षांच्या शेवटी मॅच्युरिटी लाभ मिळवा. मॅच्युरिटीवर, ग्राहकाला फंडाचे मूल्य किंवा हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ यापैकी जी रक्कम जास्त असेल ती मिळते, ज्यामुळे हमीयुक्त परिणामाचे आश्वासन मिळते.या लाँचवर भाष्य करताना आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. विकास गुप्‍ता म्हणाले, “हमीयुक्त परतावा शोधणारे ग्राहक पारंपारिकपणे मुदत ठेवी, बाँड्स आणि इतर हमीयुक्त-परतावा उत्पादनांसारख्या साधनांवर अवलंबून असतात. पण, ग्राहक आता अशा सोल्यूशन्सच्या शोधात आहेत, जे त्यांना हमीयुक्त परतावा आणि आर्थिक संरक्षणासोबतच कर-पश्चात अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यास मदत करू शकतील. आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर सिक्युअरची रचना हीच गरज पूर्ण करण्यासाठी करण्यात आली असून, एकाच प्रस्तावामध्ये युलिपचे फायदे, इन-बिल्ट हमीयुक्त मॅच्युरिटी लाभ आणि लाईफ कव्हर यांचा मेळ घालण्यात आला आहे.”

Comments are closed.

error: Content is protected !!