विविध पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी

 

कोल्हापूर: आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील विविध पालखी तळांना भेट देऊन तेथील आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली.

यावेळी वारकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता, शौचालये तसेच इतर आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती घेतली. भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक सुविधा वेळेत आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लाखो वारकरी भाविकांची सेवा हीच माऊलीची सेवा मानून, प्रत्येक भाविकाला सुरक्षित, निरोगी आणि सुखकर वारीचा अनुभव मिळावा, ही आपली सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने योगदान दिले तर यंदाची वारी वारकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने सुखकर ठरेल.

Comments are closed.

error: Content is protected !!