निदानापासून उपचारापर्यंत प्रत्येकाला समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा

 

मुंबई: महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्य-शासित एल 2 व एल 3 कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला निदानापासून उपचारापर्यंत समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाकेअर कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील कर्करोगाचे निर्मूलन करण्यात येईल.

महाकेअर अंतर्गत नागपूमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याचबरोबर महाकेअर कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी 100 कोटी रुपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यासही तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारण्यास व स्वीकारणे, महाकेअरच्या कार्यालयासाठी जी.टी.रुग्णालय येथील इमारतीत जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचे लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती करणे, सल्लागार नेमणे आदी विषयांनाही संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.यावेळी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबरोबर तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. टाटा मेमोरियलचे मा. खत्री व महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. चंदनवाले यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) मा. ओ.पी. गुप्ता, सचिव मा. विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मा. निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य आयुक्त मा. संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त मा. अनिल भंडारी, महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार व सदस्य डॉ. कैलाश शर्मा, नवीन खत्री, उपसचिव तथा सदस्य मा. संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!