महासैनिक दरबार हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

 

कोल्हापूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती याचे औचित्य साधून कोल्हापुरात दि.22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.या अभियानाच्या पूर्वतयारीच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह येथे महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.त्याच धर्तीवर लोकांपर्यंत अधिकाधिक सेवांचा लाभ पोहोचावा या हेतूने येत्या 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन आणि स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वसामान्य माणूस विविध योजनांपासून बाजूला राहू नये, यासाठी राज्यातील सर्वच 288 मतदार संघात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कोल्हापुरात देखील महासैनिक दरबार हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात सर्वच शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली मिळणार असून महायुतीच्या सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, आणि लोकांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करून देऊन शिबिर यशस्वी करावे असे आवाहन केले.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी शासकीय स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या शिबिरा बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले, तसेच शहरासोबत ग्रामीण भागात देखील हे शिबीर तसेच 22 व 23 रोजी महारक्तदान शिबीर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीला महापौर सौ. रूपाराणी निकम, शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव,भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव,उपमहापौर अक्षय जरग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नगरसेवक आदिल फरास, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. शिला सोनुले, राहुल चिकोडे, महानगर अध्यक्ष शिवाजीराव जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!