जेव्हा आकस्मिक अडथळ्यांमुळे तुमच्या प्रवासावर परिणाम होतो. अशा स्थितीत ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या संरक्षण कवचाची भूमिका निभावतो. सध्या भारतीय प्रवाशांना अशा आकस्मिक आव्हानांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. सध्या डिसेंबर मधील ऑपरेशनल आव्हानांमुळे दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु आणि हैदराबाद यासह प्रमुख विमानतळांवर मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंब होणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहे.तुम्ही सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घेतली असल्यास अशा ‘संकटकालीन स्थितीत’ तुमचे कव्हरेज नेमके कसे आणि कुठे उपयुक्त ठरू शकते हे जाणून घेण्याची सर्वोत्तम संधी असते. एअरलाईन ऑपरेशनच्या काही कठीण समस्यांच्या पार्श्वभूमीवर उड्डाणे रद्द होणे, एखादे ट्रान्सफर चुकणे, आपत्कालीन वैद्यकीय गरजा किंवा हॉटेलमध्ये व्यत्यय येणे यासारख्या समस्यांचा सामना करत असल्यास क्लेम कसा दाखला करायचा हे नेमके जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुमचा ट्रॅव्हल क्लेम दाखल करण्यापूर्वी विचाराधीन बाबी?
तुमचे प्रवासाचे ठिकाण कुठलेही असले तरीही तुम्हाला सध्याच्या परिस्थितीसारख्या काही आपत्कालीन परिस्थितींना सामना करावा लागू शकतो. तुमची ट्रॅव्हल क्लेम प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी माहिती असणे योग्य आहे.
ट्रॅव्हल पूर्व-तयारी
तुम्ही तुमच्या ट्रिपवर नेणाऱ्या सर्व महागड्या वस्तूंचे डॉक्युमेंटेशन करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आवडत्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्ही घेऊन जाणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू/डॉक्युमेंट्सचे पुरेसे फोटो आम्ही घेतले आहेत हे सुनिश्चित करा. तुमच्या सर्व ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सची कॉपी तयार करून ती कुटुंबातील सदस्याकडे किंवा मित्राकडे ठेवणे आणि मूळ कॉपी तुमच्यासोबत ठेवणे ही योग्य पद्धत आहे.
ब्लूप्रिंट वाचणे
कोणत्याही प्रकारचा इन्श्युरन्स खरेदी करताना पॉलिसी डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल पॉलिसी मधील समावेश आणि अपवाद यांची जाणीव होईल. पॉलिसी मजकूर तुमच्या ट्रॅव्हल इन्श्युररच्या अधिकृत वेबसाईटवर सहज उपलब्ध असतात. क्लेम दाखल करताना, पॉलिसीची चांगली माहिती असल्याने तुम्हाला सूचीबद्ध मर्यादांमुळे क्लेम स्वीकार्यतेची जाणीव होण्यास मदत होईल. सामान्य समावेशांमध्ये फ्लाईट कॅन्सलेशन व विलंब होणे, कनेक्शन चुकणे, सामान हरवणे किंवा विलंबाने मिळणे, आणि वैद्यकीय आपत्कालीन खर्च यांचा समावेश होतो.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती साठी
आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघाताच्या बाबतीत, तत्काळ तुमच्या इन्श्युरन्स कंपनीला कळवा. तुम्ही सर्व वैद्यकीय पावत्या आणि रिपोर्ट्स व्यवस्थित ठेवल्याचे सुनिश्चित करा. विशेषतः परदेशात असताना. अशा पावत्यांचा वापर इन्श्युररद्वारे तुमच्या उपचाराची जागा निश्चित करण्यासाठी केला जाईल. थर्ड पार्टीच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताच्या बाबतीत, पोलिसांकडून रिपोर्ट मिळवा आणि इन्श्युररकडे सबमिट करण्यासाठी त्याची एक कॉपी तयार ठेवा.
चोरीला गेलेले किंवा हरवलेले सामान
एअरपोर्ट्स पासून हॉटेल्स पर्यंत, अशा अनेक ठिकाणी तुमचे सामान चोरी होऊ शकते. विशेषतः काही विदेशी देशांमध्ये. अशा प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये हरवलेले सामान आणि आवश्यक गोष्टी जसे की कपडे, टॉयलेटरीज आणि आवश्यक रिप्लेसमेंट यासाठी भरपाई दिली जाते. असे काही घडल्यास, पोलिस स्टेशन कडून लिखित रिपोर्ट मिळवा आणि लगेच तुमच्या इन्श्युरन्स कंपनीला त्याविषयी माहिती द्या. यामुळे तुम्हाला तुमचा क्लेम दाखल करण्यासाठी योग्य पुरावा मिळेल हे सुनिश्चित होईल.
क्लेम तत्काळ दाखल करा
प्रत्येक इन्श्युरन्स कंपनीची एक ठराविक वेळ असते. ज्यामध्ये तुम्ही तुमचा क्लेम दाखल करू शकता. विशेषतः सुट्ट्यांच्या काळानंतर, असे अपेक्षित असते की जास्त क्लेम दाखल केले जातील. आजकाल, बहुतांश कंपन्या तुम्हाला क्लेम ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा देतात. क्लेम सुरू करण्यासाठी, तुमच्या इन्श्युरन्स कंपनीच्या वेबसाईटवरून क्लेम फॉर्म डाउनलोड करा आणि योग्यरित्या भरलेला फॉर्म सबमिट करा. खर्च रिएम्बर्समेंट होण्याची शक्यता वाढवण्यासाठी सर्व संबंधित पुरावे जोडायला विसरू नका.
तुम्ही सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घेतली असल्यास, क्लेम कसा दाखल करावा हे जाणून घेऊन ती योग्यरित्या त्याच्या उद्देश साध्य करते हे सुनिश्चित करण्याची हीच वेळ आहे. काहींना या प्रक्रियेत सहभागी होण्यास संकोच वाटू शकतो. पण त्यातून मिळणारे आर्थिक संरक्षण हे त्या प्रयत्नांपेक्षा खूप जास्त महत्वाचे आहे. फ्लाईट प्रवासात व्यत्यय, सामान हरवणे किंवा अनपेक्षित आरोग्य समस्या यांसारख्या परिस्थितीत, क्लेम योग्यरित्या दाखल केल्याने तुम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळेल हे सुनिश्चित होते. अनपेक्षित परिस्थितीच्या काळात, योग्य डॉक्युमेंटेशनसह तुमचा क्लेम तात्काळ दाखल करण्यासाठी सज्ज राहणे हे आकस्मिक खर्चापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आणि तुमच्या सुट्टीचा अनुभव नंतरही आनंददायी राहावे यासाठी हे एक स्मार्ट पाऊल आहे.
राकेश कौल, चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर – रिटेल बिझनेस, बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेड
