बजाज जनरल इन्श्युरन्सच्या मोटर इन्श्युरन्स पोर्टफोलिओचा विस्तार

 

पुणे : भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडने आज संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी खास निर्मित पॅकेज्ड मोटर इन्श्युरन्स प्रॉडक्ट ‘प्रो-शील्ड’ तसेच आजच्या कनेक्टेड वाहनांसाठी आणि बदलत्या वाहन विषयक जोखमींसाठी नव्या पिढीचे मोटार इन्श्युरन्स प्रॉडक्ट असलेले वैशिष्ट्यपूर्ण ‘व्ही-पे 2.0’ सादर करण्याची घोषणा केली.
संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांवर देशाच्या सीमांचे संरक्षण आणि सुरक्षेची जबाबदारी असते. कर्तव्यपूर्तीसाठी त्यांना अनेकवेळा एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली, महत्वपूर्ण मोहिमांची जबाबदारी आणि कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहणे यांसारख्या बाबी त्यांच्या जीवनशैलीच्या अविभाज्य भागच बनतात. संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय सेवेप्रती बांधिलकी म्हणून ‘प्रो-शील्ड’ या खास प्रॉडक्टची रचना करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना कर्तव्यावर असताना दैनंदिन आयुष्यातील जोखमींना सक्षमपणे सामोरे जाता येईल. राष्ट्रसेवेचे कर्तव्य निभावताना कुठेही कार्यरत असले तरीही त्यांना संरक्षण, सुविधा आणि विश्वासपूर्ण आर्थिक आधार प्राप्त होईल.
नवीन नियुक्तीच्या ठिकाणी परवानाधारक वाहतूकदारामार्फत वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनांसाठी इन्श्युरन्स पॉलिसी संरक्षणाचा विस्तार यामध्ये समाविष्ट आहे आणि वाहनाच्या वाहतूक दरम्यान इन्श्युरन्स धारकाची कोणतीही चूक नसलेल्या पात्र अपघातांसाठी नो क्लेम बोनसचे संरक्षण मिळते.
आपत्कालीन प्रवास संरक्षण – प्रवासादरम्यान विमानतळाकडे जात असताना वाहनाला झालेल्या अपघातामुळे विमान चुकल्यास आणि हॉटेल निवासाचा खर्च झाल्यास पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन सदर खर्चाच्या परतफेडीचा समावेश होतो.
कागदपत्रे गमावल्यास संरक्षण – इन्श्युअर्ड व्यक्ती आणि त्यांचे जोडीदार यांना त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सारखे महत्वाची वाहन कागदपत्रे पुन्हा प्राप्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
समर्पित प्राधान्य सहाय्य : वैयक्तिकृत क्लेम सहाय्य आणि देशभरातील 7,300 हून अधिक गॅरेजच्या नेटवर्कचा लाभ मिळतो.
अंतर्भूत आर्थिक संरक्षण : झिरो डेप्रीसिएशन संरक्षणासह अमर्यादित क्लेम, वजावट माफी, रोडसाईड असिस्टन्स, टायर कव्हर, रिम कव्हर, कुरतडणाऱ्या प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस कव्हर, टोईंग कव्हर, भौगोलिक क्षेत्र विस्तार, रॅली कव्हर आणि ॲक्सेसरीज कव्हर यांचा समावेश होतो.
ज्यामुळे कस्टमरला स्वतंत्रपणे अनेक कव्हरेजची निवड करण्याची गरज कमी होते. या प्रॉडक्टच्या माध्यमातून वाहन तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन, संभाव्य जोखीम, बदलते इंधन प्रकार तसेच आधुनिक वाहतुकीच्या गरजा यांसाठी संरक्षण प्रदान करून वाहन मालकीशी संबंधित बदलत्या परिस्थितीला सामोरे जाणे शक्य ठरते आणि इन्श्युरन्सचा अनुभव अधिक सुलभ व सुविधाजनक बनतो. प्राईम, क्लासिक आणि एलिट प्रकारांमध्ये उपलब्ध असून ‘व्ही-पे 2.0’ कस्टमरला त्यांच्या आवश्यकतांच्या अनुरुप सर्वोत्तम संरक्षण स्तराची निवड करण्याची परवानगी देतो.
वैशिष्ट्यपूर्ण प्रॉडक्टमध्ये इंडस्ट्री मधील आघाडीची वैशिष्ट्ये यात
कनेक्टेड वाहनांवर परिणाम करणाऱ्या सायबर-संबंधित घटनांसह संभाव्य जोखमींपासून कव्हर, तसेच संरक्षित सायबर घटनांमुळे होणाऱ्या पैशांच्या चोरीपासून संरक्षण.
इंधनातील भेसळ आणि विकसित होणाऱ्या इंधन तंत्रज्ञानासह सुसंगततेसाठी कव्हरेज.
अपघाती नुकसानाच्या पलीकडे होणारे अनपेक्षित यांत्रिक (मेकॅनिकल) आणि इलेक्ट्रिकल बिघाडासाठी कव्हरेज.
 स्मार्ट रिपेअर द्वारे कस्टमर्सना अधिक सोयीसाठी पॉलिसी कालावधीदरम्यान स्क्रॅच आणि पेंट चिप्स सारख्या अनेक किरकोळ नुकसानीचा क्लेम करण्याची सुविधा मिळते
स्मार्ट वाहन प्रणाली पूर्ववत करण्यासाठी तसेच दुरुस्तीनंतर ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (एडीएएस) मधील कॅमेरे आणि सेन्सर यांचे रि-कॅलिब्रेशन साठी कव्हरेज, ज्यामुळे वाहनाची सुरक्षा वैशिष्ट्ये पूर्ववत करण्यास मदत होते.
पॉलिसीच्या अटींनुसार ट्रॅक्शन बॅटरी रिप्लेसमेंट लाभांसह इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी सर्वसमावेशक संरक्षण.
100% डेप्रीसिएशन माफीसह अमर्यादित क्लेमची सुविधा, वजावट माफी, सर्वसमावेशक वाहन बदल लाभ, वाहन बिघाड किंवा अपघातानंतर सुट्या भागांची चोरी, इंजिन नुकसानीच्या व्यतिरिक्त संभाव्य नुकसानीस संरक्षण, कायदेशीर बचावाच्या खर्चास कव्हर आणि एकाच इन्श्युरन्स प्रॉडक्ट अंतर्गत एकात्मिक 360 डिग्री संरक्षण यासारखे लाभ.

बजाज जनरल इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ डॉ. तपन सिंघेल म्हणाले:”मोटर इन्श्युरन्सचा भर प्रामुख्याने अपघातानंतर वाहनाचे संरक्षण करण्यावर राहिलेला आपल्याला दिसतो. मात्र, आजच्या काळात वाहतुकीचे स्वरुप झपाट्याने बदलत आहे. वाहनांचे स्वरुप अधिकाधिक कनेक्टेड आणि तंत्रज्ञान-आधारित होत आहेत. तसेच कस्टमर वर्गाच्या गरजा पारंपरिक मोटर इन्श्युरन्स व्याप्ती पलीकडे जाऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत.
संरक्षण दलातील कर्तव्यपूर्ती साठी त्यांना अनेकवेळा नवीन नियुक्ती आणि भौगोलिक ठिकाणी वाहनांसोबत प्रवास करावा लागतो. अशावेळी पारंपारिक मोटर पॉलिसीपेक्षा अधिक आवश्यकतांची गरज भासते. या गरजांचा विचार करुनच ‘प्रो-शील्ड’ची खास रचना करण्यात आली.  दुसऱ्या बाजूला, ‘व्ही-पे 2.0’ हे संभाव्य जोखीम, विकसनशील तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे इन्श्युरन्स संरक्षण एकाच प्रॉडक्ट मध्ये एकत्रित करून आधुनिक वाहनांच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतिबिंब दर्शवते. त्यामुळे वाहनमालकांसाठी मोटर इन्श्युरन्स अधिकाधिक सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे.
खरंतर हे दोन स्वतंत्र इन्श्युरन्स प्रॉडक्ट आहेत.”
‘प्रो-शील्ड’ आणि ‘व्ही-पे 2.0’ च्या माध्यमातून, बजाज जनरल इन्श्युरन्स संरक्षण दलाच्या जीवनशैली विषयक विशिष्ट गरजा, आधुनिक वाहनांची वाढती गुंतागुंत आणि वर्तमान कस्टमरच्या बदलत्या अपेक्षा यांचा विचार करून, मोटर इन्श्युरन्सची व्याप्ती पारंपरिक अपघात संरक्षणाच्या पलीकडे विस्तारत आहे.
बजाज जनरल इन्श्युरन्स संबंधित मीडिया शंकांसाठी, कृपया संपर्क साधा:
मोनिका मयूर: +91 9860097043 | monica.mayur@BajajGeneral.com
रिचा गायकवाड: +91 8308598200 | Richa.Gaikwad@BajajGeneral.com
प्रणव कोकणे: +91 8484072781 | pranav.kokane@bajajgeneral.com

Comments are closed.

error: Content is protected !!