बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ

 

मुंबई, कल्याण, रायगड, पुणे, नागपूर, पालघर, भिवंडी, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर आणि वसई-विरार यांचा बीपीसीएलच्या ऐतिहासिक १०० शहरांतील विस्तारात समावेश; हलक्या वजनाचे कंपोझिट सिलिंडर, त्वरित नवीन कनेक्शन आणि एक्सप्रेस डिलिव्हरीमुळे एलपीजी ग्राहकांच्या सुविधेत मोठी वाढमहाराष्ट्र, २० ऑगस्ट २०२६: फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि महारत्न पीएसयू असलेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मुंबई, कल्याण, रायगड, पुणे, नागपूर, पालघर, भिवंडी, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर आणि वसई-विरार या शहरांमध्ये भारतगॅस लाइट झिप ही प्रीमियम आणि ग्राहकांच्या सुविधेला प्राधान्य देणारी एलपीजी सेवा सुरू करत आहे.महाराष्ट्रातील मुंबई, कल्याण, रायगड, पुणे, नागपूर, पालघर, भिवंडी, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर आणि वसई-विरार येथे ही सेवा उपलब्ध आहे. या विस्ताराअंतर्गत बीपीसीएलचा हलक्या वजनाचा भारतगॅस लाइट कंपोझिट सिलिंडर, इन्स्टंट न्यू कनेक्शन आणि एक्सप्रेस डिलिव्हरी यांचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या एलपीजी ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैली आणि अपेक्षा लक्षात घेऊन ही एकात्मिक सुविधा विकसित करण्यात आली आहे.आता तिची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहेभारतगॅस लाइट कंपोझिट सिलिंडर हलक्या वजनाचा, गंजरोधक आणि पारदर्शक आहे, ज्यामुळे ग्राहकांना सिलिंडरमधील एलपीजीची पातळी सहज पाहता येते. त्याची आधुनिक रचना, अधिक सुरक्षितता आणि हाताळण्याची सुलभता यामुळे हा सिलिंडर आधुनिक कुटुंबांसाठी विशेषतः उपयुक्त ठरतो.यासोबत ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे:एक्सप्रेस डिलिव्हरी ही सेवा सिलिंडरची जलद डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. दैनंदिन सेवांमध्ये वेग आणि विश्वासार्हतेची वाढती अपेक्षा असलेल्या ग्राहकांसाठी यामुळे अधिक सुविधा उपलब्ध होते. या सर्व सुविधांच्या एकत्रित माध्यमातून महाराष्ट्रातील नोकरी करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, तरुण कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि स्थलांतरित लोकसंख्या यांच्यासाठी त्यांच्या गरजेनुसार वेगळा आणि अधिक सोयीस्कर एलपीजी अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे.भारतगॅस लाइट झिपचा महाराष्ट्रासह इतर बाजारपेठांमध्ये विस्तार होत असताना, भारतीय कुटुंबांसाठी दैनंदिन ऊर्जा वापर अधिक सोपा, स्मार्ट आणि सुविधाजनक करण्यावर बीपीसीएलचा भर अधिकाधिक मजबूत होत आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!