गोकुळच्या दूध उत्पादकांच्या आणि संस्थांच्या हक्कासाठी संघर्ष करतोय हे माझ्यासाठी पुण्याईचं काम : आ.सतेज पाटील

 

कोल्हापूर: गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज राधानगरी तालुक्यातील शेतकरी, दूधउत्पादक आणि ठरावधरकांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यात जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, धीरज डोंगळे, बी. के. डोंगळे, संजय डोंगळे, धैर्यशील पाटील- कौलवकर, उदयसिंह पाटील- कौलवकर, सदाशिव चरापले, सुशिल पाटील- कौलवकर, मोहन पाटील, युवराज पाटील, फत्तेसिंह भोसले, राजू पाटील, एस. ए. पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, भिकाजी एकल, विकास खोराटे, विठ्ठलराव खोराटे, राजेंद्र पाटील, भास्कर खोत, उमेश भोईटे, वनिता भरत पाटील, अशोक फराकटे, सचिन पाटील यांची भेट आ सतेज पाटील घेतली.

शेतकरी आणि दुध उत्पादक कुटुंबांच्या आयुष्याचा आधार आहे. गोकुळच्या साडेपाच लाख शेतकरी दूध उत्पादकांच्या आणि संस्थांच्या हितासाठी धडपडतोय हे माझ्यासाठी पुण्याईचं काम समजतो. गोकुळमध्ये लोकशाहीतून सहकार जपण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे गोकुळच्या प्रत्येक सभासदाचा तसेच संस्थांचा हक्क आणि हित जपण्यासाठी आमचा संघर्ष कायम सुरू राहील. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.या दौऱ्यात अभिजीत तायशेटे, रणधीर मोरे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, बाबासो चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, श्रीमती अंजनाताई रेडेकर, विश्वजीत रणजीतसिंह पाटील, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, विशाल गोपाळराव पाटील, शशिकांत खोत, उदय पाटील- सडोलीकर, अमर पाटील- शिंगणापूरकर यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed.

error: Content is protected !!