कोल्हापूर : जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना एक्सलंन्स अवॉर्ड या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यूरोसर्जरी आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य नाविन्य, उद्योजकीय दृष्टी आणि ट्रान्सलेशनल उत्कृष्टता यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार त्यांची मातृ संस्था श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीकडून प्रदान करण्यात आला. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत येणारी एकमेव केंद्र सरकारी संस्था आहे आणि हृदय व मेंदूसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे स्वदेशातच विकसित करणारी भारतातील एकमेव संस्था आहे.
हा वैयक्तिक सन्मान नाही. हा माझ्या आवड, चिकाटी, सातत्य, जिद्द, रुग्णसेवेतील करुणा, माझ्या संपूर्ण टीमचा सन्मान आहे. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठबळ हेच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. अशी प्रतिक्रिया डॉ. शिवशंकर मारजक्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा सन्मान सिद्ध करतो की *”उत्कृष्टतेला कोणतेही पोस्टकोड नसते.”*
