जयंत आसवकर हे २०२० साली आमदार झाले त्यावेळी महाराष्ट्रात सेना+ कॉंग्रेस+ राष्ट्रवादी चे सरकार सत्तेवर होते… मग आपण त्यावेळी स्वतःच्या सरकारला आग्रह करून जुनी पेन्शन का लागू केली नाही…? असा सवाल आता शिक्षक करत आहेत.
शिक्षकांचा अजून एक ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे पवित्र पोर्टल. पवित्र पोर्टलची रेंगाळणारी कार्यपद्धती आणि त्यातील त्रुटी… या पवित्र पोर्टलच्या प्रश्नासाठी सहा वर्षे पाठपुरावा केला असेल, तर त्यातून नेमके काय साध्य झाले? शिक्षकांना आजही तोच प्रश्न मांडावा का लागतोय? असा सवाल भाजपा महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना केला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आता बदल होण्याची गरज आहे. आणि याचे उत्तर कोण देणार तर.. उत्तर एकच ते म्हणजे कौस्तुभ गावडे… ज्यांची शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्याची ईच्छा, अचंबित करणारी निर्णय क्षमता, पाच पिढींचा शैक्षणिक वारसा, शिक्षकांबद्दलची तळमळ आणि शिक्षकांचे प्रश्न मुद्देसूद पद्धतीने मांडण्याची उत्कृष्ट कला या गुणांमुळे शिक्षकांचे निश्चितपणे भविष्य उज्वल होणार आहे.
आता पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यातच, विद्यमान आमदार आसगावकर यांना प्रश्न विचारले जात आहेत. किती निवेदने दिली यापेक्षा किती प्रश्न सुटले, याचा हिशोब द्या. शिक्षकांना आश्वासनांपेक्षा ठोस उत्तर आणि प्रत्यक्ष निकाल हवा आहे.पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील एक आश्वासक, विश्वसनीय, आपल्या हक्काचे नेतृत्व आणि अडचणीत धावुन येणारे व्यक्तीमत्व म्हणजे युवा नेतृत्व कौस्तुभ गावडे. सध्याचे शिक्षक निवडणुकीचे वातावरण तापले असून कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांचा तसेच संघटनांचा वाढता पाठिंबा आणि पसंती मिळत आहे. असे दिसून येत आहे.
