पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री ;महायुतीचा शिक्षक व संस्थाचालक महामेळावा उत्साहात

 

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे इतिहास घडवतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यांच्या हक्कांसाठी प्रसंगी मध्यरात्रीही धावून जाणारा आणि शासनदरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणारा कर्तृत्ववान प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविण्याची ही महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे सर्व शिक्षक आणि संस्थाचालकांनी एकजुटीने काम करून कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केल.

धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवन येथे भाजपा-महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक व संस्थाचालकांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला महायुतीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे महामेळाव्याला राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.शिक्षकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करताना उमेदवार कौस्तुभ गावडे म्हणाले, “शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. गरज पडल्यास रात्री बारा वाजताही मुख्यमंत्र्यांना फोन करून शिक्षकांचे काम करून घेईन. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन.”पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीने उच्चशिक्षित, अभ्यासू आणि शिक्षण क्षेत्राची प्रत्यक्ष जाण असलेला उमेदवार दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत सक्षम आवाज मिळण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे मेळाव्यात अधोरेखित करण्यात आले.शिक्षकांच्या अडचणी समजून घेणारा, त्यांच्या कामासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारा आणि गरज पडल्यास कोणत्याही वेळी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी विधान परिषदेत असणे ही काळाची गरज आहे. कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी आई अंबाबाईचा आशीर्वाद आणि महायुतीची ताकद असल्याने त्यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!