पुणे शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे विजयी

 

कोल्हापूर: पुणे शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे विजयी
विजयी झाले त्यांनी हा विजय खेचून आणला सचिन सानप यांचा पराभव करत कौस्तुभ गावडे यांनी आपल्या विजयावर मोहर उमटवली.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांची शिक्षक मतदारसंघातून आमदारपदी निवडून आल्याने विवेकानंद कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कॉलेजमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या यशाबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थितांनी एकमेकांचे अभिनंदन केले. कौस्तुभ गावडे यांच्या आमदारपदी निवडीमुळे शिक्षण क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एका नव्या चेहऱ्याला संधी मिळाल्याने तसेच युवा नेतृत्व असल्याने कौस्तुभ गावडे यांच्याकडे सर्व शिक्षक कर्मचारी आपल्या प्रलंबित समस्यांसाठी आशापूर्वक बघत आहेत.

Comments are closed.

error: Content is protected !!