गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बिजे कोल्हापूरात रूजली: आमदार सतेज पाटील

 

कोल्हापूर: साडे पाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन मागील दाराने गोकुळवर कब्जा मिळवणाऱ्या महायुती सरकारविरोधात तसेच लोकशाही आणि सहकार टिकवण्यासाठी काढलेल्या कोल्हापूरचा संघर्ष मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आपण लढलो की जिंकतो आणि त्याला लोक भक्कम पाठबळ देतात हा विश्वास यानिमित्ताने अधिक प्रबळ झाला. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला एक वेगळी उर्जा आणि विश्वास गोकुळच्या लढाईने दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरवात झाली असून त्याची बिजे कोल्हापूरच्या भुमीत रूजली आहेत. असा घणाणात आमदार सतेज पाटील यांनी केला. आज संघर्ष महा मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.याचना नही अभी रण होगा,रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा हौगा,अशा भावना व्यक्त केल्या.शाहू महाराजांच्या कोल्हापूर मध्ये सहकार कायदा पायदळी तुडवला जात आहे.सूडबुद्धीने सरकार वागते. प्रशासक नेमणूक करू नये. म्हणून सांगत होतो. आमच्या 1400 संस्थान कोर्टात जावे लागले. अदृश्य शक्ती कोण हे सांगायचे धाडस मुश्रीफ यांचे नव्हते.3 मंत्री..2 खासदार..10 आमदार.. पण त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी अशी लढत होती…. साडे पाच लाख शेतकऱ्यांसाठी लढा उभारला. आमचे 25 उमेदवार हे कार्यकर्ते आहेत. स्वतः च्या मुलाला उमेदवारी दिली. मग जाती वाद कुठला आला.सत्तेच्या दाराजवळ आम्ही कधी बसलो नाही. गोकुळ चे दर बंटी पाटील यांच्या मूळ उघडले. हे त्यांनी लक्षात घ्यावे.चंद्रकांत पाटील आणि मुश्रीफ यांचे षडयंत्र आहे. तुम्ही प्रामाणिक राहिला नाहीत. दूध उत्पादक तज्ञ म्हणून घेतले नाहीत. तर सांगली चे वकील, डॉक्टर यांना तज्ञ म्हणून घेत आहेत. पुन्हा मतदानाचा अधिकार देता येत नाही.सरदार पटेल फेडरेशन मध्ये 20 राज्यातील दूध संकलन करण्यासाठी हा सर्वा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री चेअरमन ठरवतील. असे कसे. पण गोकुळ कोल्हापूर च्या मालकीचा झाला पाहिजे. हे सतत कायदे बदलतील.एकेक दूध संघ एनडीडीबी कडे द्यायचे चालले आहे.. सहकार मोडीत काढण्याचा डाव. आहे.चार लोकांना परवानगी देऊ नये.कोरमचा विषय येतच नाही.12 संचालकांनी उद्या उपस्थित रहावे. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. मी एक पाऊल टाकले होते. एकत्रितपणे कारभार करूया. कोल्हापूर संघर्षाची भूमी आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

हा गोकुळ दूध उत्पादकांवर अन्याय आहे.त्यांनी कौल स्वीकारायला पाहिजे होता. पण बंटी पाटील यांचे संचालक फुटू शकत नाही . आमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. ही लढाई महाराष्ट्राची आहे असे विश्वजित कदम यांनी म्हटले.

गोकुळ कोल्हापूर च्या जनतेचा आहे.5400 ठराव धारक असून त्यांना यश आले नाही.कारण हे कोल्हापूर आहे. ते रडीचा डाव खेळत आहेत.त्यांना सहकार कधी कळला नाहीस्वीकृत संचालक ना मतदानाचा अधिकार देता येत नाही. त्यामुळे आपली भूमिका चुकीची नाही.गावातून आलेला दूध उत्पादक आहे.त्यांचा न्यायावर विश्वास उडू नये असा निकाल न्यायालयाने द्यावा.माधुरी हत्ती परत आणली.त्यामुळे जनमताचा रेटा आहे.पूर्वी मल्टी स्टेट चा डाव हाणून पडला. पण त्यांनी गुजराती डाव टाकला. शक्ती पीठ महामार्ग हा गुजराती उद्योज पतीला खुश करण्यासाठी लादला जात आहे.गुजरात ईस्ट इंडिया कंपनी सारखे आहे. आता अमित शहा यांना चेअरमन करा एवढंच बाकी आहे.पण जावयाला कोल्हापूर मध्ये पाऊल ठेवू देणार नाही. असे टिकास्त्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोडले.

लोकशाहीचा आदर करत सहकारी संस्था चालत होत्या.तज्ञ स्वीकृत 1 किंवा 2 पेक्षा जास्त नसायचे.. लोकशाहीची सर्व मूल्ये धाब्यावर बसवली आहे.हे उघड्या डोळ्यांनी जनता बघत आहे…. अन्याय किती करायचा याला मर्यादा असतात.चुकीचा पायंडा पाडू नका. बॅलेट पेपर वर निवडून येता येते. हे बंटी पाटील यांनी दाखवले.बहुमत ने अध्यक्ष निवड हीच लोकशाही आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहीते- पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!