
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 9.00 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.अिानी रामाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नींचा महापालिकेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.
आयुक्त पी.शिवशंकर, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सर्व नगरसेवक/नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे महापालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे
Leave a Reply