
कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ‘सनातन संस्थे’चा साधक व संशयित आरोपी समीर गायकवाड यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. कोल्हापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात आज हे आरोपपत्र सादर करण्यात आलं.
समीर गायकवाड सध्या कळंब तुरुंगात आहे. त्याच्याविरोधात तब्बल ३९२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ७७ साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे हे आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी आज सकाळी शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील तसंच मेघा पानसरे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली.
समीरच्या न्यायालयीन कोठडीत १८ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गायकवाडला १५ सप्टेंबरला सांगलीतून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून २३ मोबाइल व ३१ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
Leave a Reply