
कोल्हापूर: अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवास येत्या 18 डिसेंबर पासून शानदार प्रारंभ होत आहे.बाबुराव फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने हा 4 था फिल्म फेस्टिवल ( किफ) कोल्हापुरात पार पडत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन हिंदी व मराठीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्या शुभ हस्ते होणार असून यावर्षिचा कलामहर्षि बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कसरावल्ली यांना तर चित्रमहर्षि आनंदराव पेंटर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना जाहिर झाला आहे. अशी माहिती मिलिंद अष्टेकर यांनी दिली. विविध विभागातील 50 चित्रपट, 30 लघुपट, नविन मराठी चित्रपटांचे कलावंत दिग्दर्शक यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. लघुपट स्पर्धेतील 15 लघुपटांचे प्रदर्शन होणार असून विजेत्या लघुपटांना अभिनेता ऋषिकेश जोशी व साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.प्रवेशिका शुल्क मधे महाविद्यालयीन विद्यर्थ्याना 50 टक्के सवलत असणार आहे.तरी कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या महोत्सवास उपस्थिती द्यावी असे अवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply