
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्ष्याच्यावतीने आज जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.कॉ.गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी एस.आय.ती प्रमुखांचे मुख्यालय कोल्हापुरात करावे,कोल्हापुरात राहूनच तपास करावा,समीर गायकवाड तसेच सनातन संस्थेच्या साधकांवर देश द्रोहाचे आरोप लावावेत. तसेच त्यांच्यावर मोका लावून कारवाई करावी,पुरवणी दोषारोप दाखल करताना विविध तज्ञ लोकांची मदत घ्यावी.अशा जेणेकरून तपास जलद व्हावा अशी मागणीही करण्यात आली.यावेळी कॉ.सतीशचंद्र कांबळे,नामदेव पाटील,दिनकर सूर्यवंशी,अशा कुकडे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply