सेटवर घरच्यासारखेच वाटते… गोदाक्का : तुझ्यात जीव रंगला…उत्सव कलाकरांचा

 

कोल्हापुरात शूटिंग असल्याने सेटवर घरच्यासारखेच वाटते… गोदाक्का 

मी कोल्हापूरचीच आहे त्यामुळे  ‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर शूटिंग सुरू आहे पण मला शूटिंग करतोय असं कधी जाणवलच नाही, मी घरच्याप्रमाणे इथेही वावरते. प्रत्येक सणाला कोल्हापूरची संस्कृती जपते. परंपरेनुसार रुढी प्रथा सांगते. त्या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. वसगडे गावातील लोकांच्या सहकार्यामुळेच गेली तीन वर्षे या गावात शूटिंग व्यवस्थित सुरू आहे. सहकलाकारांचे उत्तम सहकार्य नेहमीच मिळते. लाइट्समन व तंत्रज्ञ खूप मेहनत घेतात.त्यामुळे इतकी लोकप्रियता मिळाली. दिवाळीनिमित्त कोल्हापूरची खासियत असणारे पदार्थ सेटवर बनत आहेत. मी कोल्हापुरात असले तरी कधी एकदा वसगडेत येते याची मला ओढ लागते. आपल्या कोल्हापूरला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अशा भावना मालिकेतील गोदाक्का म्हणजे छायाताई सांगावकर यांनी व्यक्त केल्या. मालिकेतून फक्त मनोरंजनच नाही तर शिक्षणाचे, शेतीचे, एकत्र कुटुंबाचे महत्त्व, मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये असे मोलाचे संदेश दिले आहेत. दिवाळीच्या विशेष भागाचे सध्या शूटिंग सुरू आहे. मला दिवाळीचा फराळ करायला आणि खाऊ घालायला खूप आवडतो असे छायाताई म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!