पुणे:मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशीदिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुखभूमिका असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पत्रकारपरिषद नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यातआली होती. या पत्रकार परिषदेत निर्माते मोहसिनअख्तर, प्रेझेंटर उर्मिला मातोंडकर, संगीतकारअवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, कलाकारसोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी आणि या चित्रपटाचे लेखकसमीर अरोरा उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पत्रकारांना या चित्रपटाचा ट्रेलरदाखवण्यात आला. सोनाली कुलकर्णीनेसाकारलेली एका तरुणीची भूमिका, सध्या तरुणपिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईटप्रसंग, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरेजाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करावे हे याट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तसेच सोनालीकुलकर्णी, शरद केळकर, संहिता जोशी, अक्षयकेळकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या पात्रांचीझलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो. पत्रकारांनीया ट्रेलरला पसंती दर्शवून या चित्रपटाच्या टीमशीमनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटा दरम्यानघडलेले अनेक किस्से पत्रकारांनी जाणून घेतले. या पत्रकार परिषदते घडलेली आणखी एक खासगोष्ट म्हणजे या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांच्याआवाजातील ‘सॉरी’ हे गाणं पुण्यातील पत्रकारांच्याउपस्थित प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यासाठीघेतलेली खास मेहनत आणि सॉरी म्हणतानानेमक्या काय भावना मनात असतात हे गाण्यातूनमांडतानाचा अनुभव याविषयी पत्रकारांसोबत गप्पा रंगल्या.मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचापहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटकेलूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय यासगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’चित्रपट ३०नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.