

कोल्हापूर विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे, याकरिता आमदार अमल महाडिक यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विमानतळासाठी ६४ एकर जागा संपादित करण्यासाठी आमदार महाडिक यांनी, शासनाकडून निधी संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच विमानतळाला आवश्यक इतर सेवा सुविधा पुरवण्याबाबत आमदार अमल महाडिक विशेष प्रयत्नशिल आहेत. विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांची मुंबईत आमदार महाडिक यांनी भेट घेतली आणि कोल्हापूर विमानतळ पूर्णक्षमतेने लवकरात लवकर सुरू करावे, यासाठी ज्या समस्या आहेत, त्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी केली. कोल्हापूर – मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली. त्याचप्रमाणे नाईट लँडींग फॅसिलीटी सुरू झाल्यास, कोल्हापूर विमानतळाला उर्जितावस्था येईल. त्यामुळे कोल्हापुरात नाईट लँडींग फॅसिलीटी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मोठी विमाने कोल्हापुरात उतरू शकतात. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने लक्ष घालावे, अशी मागणीही आमदार महाडिक यांनी केली. त्यावर केशव शर्मा यांनी या मागण्यांची निर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्याची ग्वाही दिली.
Leave a Reply