
कराड : 15 वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांना तीव्र वेदना होत असलेल्या एका 85 वर्षीय गृहस्थावर सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे कॉम्प्युटर गाईडेड रोबो शस्त्रक्रियेद्वारे एकाच दिवशी दोन्ही गुडघ्यांचे रोपण करण्यात आले.त्यामुळे त्या गृहस्थांना शस्त्रक्रियेनंतर तत्काळ आराम मिळाला. त्यांचे जास्तीचे वय व झालेली सांध्यांची विकृती बघता त्यांना अनेक हॉस्पिटल्सने गुडघे रोपणासाठी नकार दिला. परंतु सह्याद्रि हॉस्पिटलने हे आव्हान स्विकारले व शस्त्रक्रिया केली.या शस्त्रक्रियेविषयी बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्समधील तज्ञ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.अभिजित आगाशे म्हणाले, जेव्हा हे गृहस्थ आमच्याकडे आले तेव्हा त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना तीव्र वेदना होत होत्या. दोन्ही गुडघ्यामधील कुर्च्यांची झीज झाल्यामुळे हाडे एकमेकांना घासत होती आणि यामुळे त्यांचे गुडघे दुखत होते. त्यांची ही परिस्थिती पाहता रोबो कॉम्प्युटर गाईडेड शस्त्रक्रिया करायचे आम्ही ठरवले. ही शस्त्रक्रिया किती अचूक व सुरक्षित आहे,याबाबत आम्ही त्यांना समजून सांगितले. त्यांनी तयारी दर्शविल्यावर शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही गुडघ्याच्या शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या. रोबो कॉम्प्युटर गाईडेड शस्त्रक्रिया असल्यामुळे दोन्ही पायातील विकृती संपूर्णपणे काढता आली,कमीत कमी रक्तस्त्राव झाला. त्याशिवाय पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये जास्त वय असल्यामुळे हाडाच्या पोकळीमध्ये रॉड टाकण्याची गरज लागू शकते ती येथे लागली नाही. रोबो कॉम्प्युटर गाईडेड शस्त्रक्रिया असल्यामुळे या वयालाही दोन्ही गुडघ्यांचे रोपण एकाच दिवशी करणे शक्य झाले.
Leave a Reply