
स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलंय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम आणि मधुराला परिस्थीतीने मात्र वेगळं केलंय. एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याच्या टप्यावरच त्यांना विरहाला सामोरं जावं लागतंय. मधुरावरील प्रेम व्यक्त करत असतानाच विक्रमचा अपघात झाला. मधुराच्या मनात विक्रमविषयी जरी प्रेम असलं तरी ते तिला व्यक्त करता येत नाहीय. आता तर मधुरा आणि विक्रमच्या घरच्यांकडूनच दोघांच्याही प्रेमाला विरोध होतोय. त्यामुळे विक्रम आणि मधुराच्या प्रेमकहाणीचं पुढे काय होणार याची उत्सुकता निर्माण झालीय.मधुरा आणि विक्रम पुन्हा एकत्र येणार का? घरच्यांच्या विरोधापुढे हे दोघं झुकणार की नव्या आयुष्याची सुरुवात करणार? हे पाहण्यासाठी ‘छत्रीवाली’ मालिकेचे एपिसोड्स पाहायला विसरु नका दररोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply